डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर मधील जय बजरंग मित्र मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीला हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांसह अमोल पाटील यांनी मंडळाला भेट देऊन श्री मारुतीचे दर्शन घेतले.
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष सोमनाथ देवकर म्हणाले, गेल्या २५ वर्षीपासून जय बजरंग मंडळाच्या वतीने हनुमान जयंती साजरी केली जाते.मंडळाच्यावतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम सुरू असतात. कोरोना काळातही मंडळाने समाजसेवा केली होती.प्रभू श्री रामचंद्राने कुंभकर्णाच्या वधाचे छलचित्र मंडळाच्या वतीने दाखविण्यात आले.श्री मारुतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. यावेळी अध्यक्ष अविनाश गुंजाळ, उपाध्यक्ष विनोद कुसाळकर, सल्लागार संतोष कुसाळकर, सूरज लष्कर, खजिनदार दीपक कुसाळकर, सभासद गणेश देवकर, राजू देवकर, सोमनाथ खंडागळे, रमाकांत गुंजाळ, सुनील ठाकरे, योगेश कुसाळकर, प्रथमेश महाकाळ, दर्शिल गुंजाळ, भूषण देवकर, कार्तिक देवकर, महेश लष्कर, गणेश लष्कर, सचिन लष्कर, दिनेश शिंदे, भौरव गुंजाळ, उमेश पवार, गणेश देवकर, आनंद देवकर सिद्धेश तांदळे यांनी अथक मेहनत घेतली.