Type Here to Get Search Results !

आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार


उरण दि १३ ( विठ्ठल ममताबादे ) : दिनांक ६ में २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत दद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील या समाजकंटकाने केली होती. सदर इसमावर उरण पोलीस ठाण्यात त्याने केलेल्या गुन्हयाबाबत रीतसर एफ.आय. आर देखील नोंदविण्यात आले.मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सदर इसमावर कोणतेही कायदेशीर कारवाई झाली नाही. सदर इसमावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाली नाही. त्यामूळे संतप्त ग्रामस्थांनी मतदानाच्या दिवशीच म्हणजेच १३ मे २०२४ रोजी मतदानावरच जाहीर बहिष्कार घातला आहे.याबाबत सदर सर्व ग्रामस्थ हनुमान मंदिरात एकत्र आले होते.


घडलेल्या घटनाबाबत सदर आरोपीवर कोणतेही कठोर कायदेशीर कारवाई झालेली नाही. जर आरोपीवर कारवाई झाली नाही तर लोकसभा निवडणुकीवर जसे बहिष्कार टाकले तसेच बहिष्कार विधानसभेच्या निवडणूकीवरही घालण्यात येणार आहे.असे मत आगरी कोंढरी पाडा ग्रामस्थ मंडळाचे सचिव कृष्णा पाटील यांनी दिली. तर उपाध्यक्ष धनेश म्हात्रे यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळत नाही,ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार असल्याचे सांगितले. उपस्थित महिला ग्रामस्थ पल्लवी ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमचे ग्रामस्थांचे १७०० मतदान आहे. आम्हाला न्याय न मिळाल्याने तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी लक्ष दिले नसल्याने आम्ही मतदान करणार नाही. हे असेच चालू राहिले तर १७०० मतदार पुढील विधानसभेच्या निवडणूकीत मतदान करणार नाहीत अशी माहिती पल्लवी ठाकूर यांनी दिली. सदर बहिष्कार बाबत गावातील सर्व ग्रामस्थ आगरी कोंढरीपाडा येथील श्री हनुमान मंदिरात एकत्र आले होते. यावेळी सर्वानी एकमुखी निर्णय घेत मतदानावर बहिष्कार घातला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies