Type Here to Get Search Results !

कल्याण पश्चिमेत घराला भीषण आग, सिलेंडरही स्फोट सुदैवाने जीवितहानी नाही..


डोंबिवली (शंकर जाधव ) : दोन मजली इमारतीमधील घराला भीषण आग आगीत घटना घडली. या आगीमध्ये घराचे प्रचंड नुकसान झाले असून गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याची घटना सोमवार 13 तारखेला कल्याण पश्चिमेतील रामदास वाडी परिसरात घडली.

रामदासवाडी परिसरात मैत्रेय नावाची दोन मजली इमारत असून त्यामधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या चौधरी कुटुंब राहते. सोमवारी रात्रीच्या वेळी चौधरी यांच्या घरामध्ये ही आग लागली. सुदैवाने घरामध्ये कोणीही नसल्याने कोणाला दुखापत झाली नाही. आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले.केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. आणि परिसरातील वीज पुरवठाही तात्पुरता बंद करण्यात आला. घरातील सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली असली तरी

तर ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अग्निशमक दलाचे जवान घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies