Type Here to Get Search Results !

मोदी सरकार नव्हे गजनी सरकार ; उद्धव ठाकरे यांची मोदींवर टीका ...


डोंबिवलीत भर पावसात उद्धव ठाकरेंची सभा

डोंबिवली ( शंकर जाधव ) : आताच्या भाजपला सांगतो की एवढे  निर्दयी  होऊ नका की त्यांना  आराम करू द्या. त्याच्या भाषणात काल आज काय असते ते समजत नाही.म्हणून मी या सरकारला मोदी सरकार नव्हे तर गजनी सरकार म्हणतो.या गजनी सरकारच्या हातात हे सरकार देणार आहात का ? ते कदाचित विसरून जातील की तुम्ही मतदार देशाचे आहात ,मला वाटलं की पाकिस्तानचे आहात अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत जाहीरसभेत केली.भर पावसात उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिक व नागरिकांनी गर्दी केली होती.

डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे (भागशाळा ) मैदान येथे गुरुवारी 16 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा पार पडली.कल्याण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रभारार्थ सभा सुरू होताच पावसाने हजेरी लावली.मात्र उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिक व नागरिक पावसात भिजले.


यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी तुम्ही २०१४ साली भाषणात कोणती आश्वासन दिलेत ते आठवा.त्यावेळी चारशे पार गॅस सिलेंडर आता हजारावर गेला .भूलथापा आता बस्स झाल्या.आमचे विलीनीकरणं होणार नाही पण 4 जून नंतर मोदीजी तुम्ही पंतप्रधान नसणार.आठ दहा वर्षात मोदींनी नोटाबंदी केली होती.4 तारखेला डीमोदिनेशन करणार.महाराष्ट्रात मोदींच्या पंतप्रधान म्हणून शेवटची सभा असेल.75 वर्षात राजकराण्यानी निवृत्ती घेतली पाहिजे, मग दोन वर्षात तुम्ही 75 वर्षाचे होणार आहात.

डोंबिवली हे विद्याचे माहेरघर आहे.मी येथे विचारायला आलो आहे मोदी मला नकली संतान म्हणतात.हे तुम्हाला मान्य आहे का? भाजपाचे फक्त दोनच खासदार होते ,त्यावेळी कठीण काळात अटलजींचाही पराभव झाला होता , शिवसेना व भाजपा बरोबर आपल्या बरोबर यायला त्यायला तयार नव्हता त्यावेळी भाजपला शिवसेनेने साथ दिली होती.

मोदी तुम्ही मणिपूर येथे नाही गेलात , अत्याचार जिथे झाले तिकडे गेला नाहीत.मोदी हे महिला उमेदवाराला हरविण्यासाठी कल्याणात आलात.माझ्या घराणेशाहिवर आरोप करता, तुम्हाला शिवसेनाप्रमुखांची घराणेशाही नाही चालत पण गद्दाराची घराणेशाही चालते का ? त्यांच्या मुलाला। तिसऱ्यांदा उमेदवारी दिलीत का ? उमेदवारी द्यायची होती तर पूनम महाजनच्या मुलीला का दिली नाही ? तेथील भाजप कार्यकर्त्यांना व संघाचंय कार्यकर्त्याना एक विचाराचे आहेत की ही भाजपची वाटचाल तुम्हाला मंजूर आहे का ?
महाराष्ट्र मोदींनी 25 सभा घेतल्यात. पण या सभेत माझ्यावरच बोलले.श्री रामाचा जेवढा जप केला नाही तेवढा माझे नाव घेतले.सभेत महागाई , बेरोजगारी, उद्योगधंदे, आरोग्यावर काहीही बोलले नाहीत.हे दररोज नवीन विषयावर बोलतात.त्याचे कोणीतरी भाषण लिहून देणारे संपावर गेले असावेत.म्हणून तर तेच तेच बोलतात.मोदीजी हा कल्याण लोकसभा मतदार संघात सहा विधानसभेतील आमदारावर गोळीबार करण्याची वेळ आली.

भाजप कार्यकर्त्यांनी विचार करावा की हे सगळे उपरे मांडीवर घेतले आणि भाजप आमदार जेल मध्ये आहे. भाजपच्या आमदारावर जर ही वेळ येत असेल तर पुन्हा ते निवडून आले तर कल्याण- डोंबिवलीत काय आंतक माजेल.हा आतंक संपविण्यासाठी येथे आलो आहे.एक महिला हुकूमशाही विरोधात न घाबरत उभी राहते , उद्धव ठाकरे सुद्धा तुमची लढाई लढत आहे.

अरे मी २५ वर्ष भाजपबरोबर होतो त्याच्यात विलीन नाही झालो तर आता काँग्रेस मध्ये विलीन कसे होणार. डोंबिवलीत येत असताना संपूर्ण रस्ता होडींगने भरले होते, आता त्यासाठी किती खोके लागलेअसतील त्याचा हिशोब विचारा.वैशाली दरे कर यांना उमेदवारी दिली कारण मला त्यांना शिवसेनेची शक्ती दाखवायची होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies