Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या सात जणांची निवडडोंबिवली ( शंकर जाधव ) : नुकतेच सोनीपत (हरियाणा) येथे झालेल्या १३ व्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेतील महाराष्ट्रातील सुवर्ण पदक मिळविलेल्या ७ स्पर्धकांची सोलव्हाकिया, त्रणवा, (युरोप) येथे १० ते १३ ऑक्टोबर २०२४ ला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी भारतीय संघात महाराष्ट्रातल्या सात (७) स्पर्धकांची निवड झाली. सलग ३ वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्ण पदकाची हॅट्रिक केली आहे. ही कामगिरी लक्षात ठेवून नॅचरल पॉवर लिफ्टींग संघटनने हया स्पर्धकांची निवड केली आहे. महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी केवळ सात (७) खेळाडूंची निवड झाली. 

तसेच मास्टर गटातले सलग ३ वेळा सुवर्णपदक पटकाविलेले समीर जोगळेकर ( डोंबिवली), रामदिन नंदकिशोर ( अहमदनगर ) , संभाजी अंकलेकर ( पनवेल ) सलग दोन वेळा सुवर्णपदक पटकाविलेले (४) उंडाळे गावचे रयत जिमखान्याचे प्रमोद पाटील, स्मिता प्रमोद पाटील या खेळाडूंची निवड झाली. तसेच कांदिवलीच्या प्रतिभा तावडे व सर्वात सब ज्युनिअर गटामध्ये (७) अडसरी येथील इगतपूरीची समिक्षा रमेश शिंदे यांची निवड झाली.ही निवड भारतीय नॅचरल पॉवर लिफ्टींग संघटनेचे अध्यक्ष जुगल धवन यांनी केली. फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies