डोंबिवली ( शंकर जाधव ) : मतदानाच्या चौथ्या टप्पातील मतदान दुपारी ३ वाजेपर्यत ३५ टक्क्यांवर होते. मतदान यादीत नाव नसल्याने काही मतदारांने निवडणूक आयोगाच्या नावाने बोटे मोडली.डोंबिवलीत एका आजीने गेली ४५ वर्ष न चुकता मतदान केले.आता यावर्षी मतदान यादीत नाव नसल्याने मतदानाला मुकल्याने आजीने थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली.
डोंबिवलीत सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबचा लांब रांगा दिसल्या.अनेकांची नावे मतदान यादीत नसल्याने नागरिकांनी मतदान करता येणार नसल्याने नाराजी व्यक्त केली. डोंबिवली पश्चिमेकडील जयश्री जोशी या आजी गेली ४५ वर्ष मतदान करत होत्या. मात्र लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मतदान यादीत नावे नसल्याने नाराज झाल्या होत्या. याबाबत जोशी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, माझ्या आयुष्यात प्रथमच असे झाले कि माझे नाव मतदान यादीत नाही. मी यावर्षी मतदान करू शकत नाही त्याचे खूप वाईट वाटत आहे. मी पहिलीच वेळ आहे कि मी मतदान करू शकत नाही. या आजींनी याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन माहिती दिली. तर माजी नगसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी आजींचे म्हणणे एकूण यासंदर्भात निवडणूक कार्यालयाला माहिती देऊ असे सांगितले.