Type Here to Get Search Results !

डॉ.स्वाती गाडगीळ यांचे आहार,आरोग्य ,स्वच्छता व व्यसन या विषयावर व्याख्यान


डोंबिवली ( शंकर जाधव ) : राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर प्राथमिक शाळेत आनंददायी शनिवार अंतर्गत २२ जून रोजी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रसिद्ध भुलतज्ञ डॉ. स्वाती गाडगीळ यांनी 'आहार,आरोग्य, स्वच्छता व व्यसन' या विषयावर प्रोजेक्टर मधील चित्रफितींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. 

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका भावना राठोड यांनी केले सदर प्रसंगी शाळा समितीचे सदस्य दांडेकर उपस्थित होते.आजार होण्यामागची कारणे, त्यावरील प्रतिबंध, व्यसनांपासून आरोग्यावर व समाजावर होणारे दुष्परिणाम , व्यसनांमुळे शरीरांच्या अवयवांची झालेली स्थिती, वेगवेगळ्या अवयवांच्या चित्रफितीच्या माध्यमातून दाखवले, व सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले . 

सदर प्रसंगी सूत्रसंचालन रणजीत जगदाळे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.योगिता मानभाव यांनी केले. कार्यक्रमास शाळा समिती अध्यक्ष , सदस्य व संस्थेचे पाठबळ लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies