मुलाच, मुलीच लग्नकार्यात मिळणार १०,००० हजार रुपये मदत, हॉल, पार्किंग विनामूल्य
नवी मुंबई ( विनोद वास्कर ) : ग्राम विकास मंडळ कोपरखैरणे सभा संपन्न, अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
विधवा महिलेच्या मुलाच ,मुलींच लग्न असेल तेव्हा प्रत्येक लग्न कार्यात प्रत्येकी लग्नाला मिळणार १०,००० हजार रुपये मदत, तसेच होळी मैदान व रांजण देवी मंदिर हॉल विनामूल्य द्यायचं ठरले. पार्किंग सुद्धा विनामूल्य ठरली. शिवराम पाटील यांनी ही संकल्पना मांडली. समाजसेवक महेश पाटील यांनी स्वतः पुढाकार घेतला. आणि ग्रामस्थांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
गावाच्या दृष्टीने ही खूपच आनंदाची बाब असून मीटिंग दरम्यान सर्वांनी ग्राम विकास मंडळाचे दानशूर व्यक्तीचे आभार मानले.
दानशूर व्यक्ती शिवराम पाटील, आणि महेश पाटील, या दोन्ही दानशूर व्यक्तीचे आभार ग्रामस्थांनी मानले.