Type Here to Get Search Results !

जिहादी पाकिस्तानी आतंकवाद्यांचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल ने केला निषेध


विश्व हिंदू परिषद बजरंग दल कळवा मुंब्रा जिल्हा कडून निषेध

ठाणे दि.१३, ( विनोद वास्कर ) : जम्मू काश्मीर मध्ये वैष्णोदेवी कटरा वरून काही भक्तगण /भाविक शिव खोडी ला जात असताना काही जिहादी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी त्यांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार करून १० भाविकांची हत्या केली.व जवळपास ३० ते ४० भाविकांना जखमी केले. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल मार्फत निषेध आंदोलन आयोजित केले होते. 
त्यानुसार विश्व हिंदू परिषद बजरंग दल कळवा मुंब्रा जिल्हा च्या वतीने देखील डायघर नाका कल्याण फाटा येथे १२ जून २०२४ रोजी निषेध आंदोलन आयोजित केले होते. 

सदर आंदोलनास विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री रविंद्र पाटील, मातृशक्ती प्रमुख संगीता पाटील, जिल्हा संयोजक गिरीश पाटील, धर्मजागरण प्रमुख रश्मी तिवारी, जिल्हा सेवा प्रमुख आशिष कनौजिया, धर्मप्रसार प्रमुख ओमप्रकाशजी, शीळ प्रखंड संयोजक प्रविण पावशे, साप्ताहिक मिलन प्रमुख संदेश साळुंखे, मुंब्रा प्रखंड मंत्री प्रथमेश जी, मुंब्रा प्रखंड संयोजक दिनेश जी, व कळवा मुंब्रा जिल्ह्यातील सर्व प्रखंडांचे कर्तकर्ते व सकल हिंदू समाज यांची उपस्थिती होती.

तसेच विशेष उपस्थिती म्हणून लक्ष्मण पाटील (भाजप ओबीसी जिल्हा अध्यक्ष),सुनिल आलिमकर (समाजसेवक),वैभव आलिमकर (युवासेना उपशहर प्रमुख),सुंदर आलिमकर(शाखा प्रमुख शीळ), सचिन म्हात्रे (शिवसेना-उबाठा कार्यालय प्रमुख),प्रविण पाटील (भाजप डायघर नाका प्रमुख) यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies