नवी दिल्ली : नवे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना स्मृतीचक्र अर्पण केलं.
भारतीय सेनेचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं ही बाब आपल्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे, असं ते यावेळी म्हणाले. लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं. बदलत्या जागतिक परिस्थितीत कोणत्याही समस्येचा सामना करण्यासाठी भारतीय सेना सज्ज असल्याचं ते म्हणाले. त्यांना आज लष्करी मानवंदना देण्यात आली.
लष्कराचे तिसावे प्रमुख म्हणून काल त्यांनी पदभार स्वीकारला होता. याआधी त्यांनी उप लष्करप्रमुखपदाची तसंच लष्कराच्या उत्तर कमांडची जबाबदारी सांभाळली होती.