ठाणे / शिळफाटा ( विनोद वास्कर ) : काल शिळगांवात बत्ती गुल झाली होती. विद्युत वाहिनीची तार तुटली होती. काल रात्री ९:३० वाजता पाऊस आणि वादळी वारा असल्याने विद्युत वाहिनीची मुख्य तार तुटून पडली होती. त्यामुळे शिळ गावातील बत्ती गुल झाली होती.
अनेक तक्रारी करून सुद्धा महावितरण टोरंटो पॉवर कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करायला करण्यासाठी आले नव्हते. विद्युत वाहिनीची मुख्य तार तुटून पडली होती. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. जर एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाला. तर याला जिम्मेदार महावितरण टोरंटो कंपनी कंपनी असणार आहे. अडीच तास होऊन सुद्धा महावितरण कंपनी दखल घेत नाही. महावितरण कंपनी एखाद्याचा मृत्यू होण्याची वाट बघत आहे का? आणखी किती बळी घेऊन कुटुंब उध्वस्त करणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केल्याची बातमी आपले शहर वर दाखवण्यात आली. तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली. दीड तासामध्ये प्रशासनाने दखल घेतली. रात्री १ वाजून ३० मिनिटांनी विद्युत वाहिनीची मुख्य तारेची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा विद्युत प्रवाह सुरू करण्यात आला.
लाईट येतात ग्रामस्थांनी आपले शहर मीडियाचे आणि प्रशासनाचे आभार मानले.