Type Here to Get Search Results !

घनसोली गावामध्ये दररोज होते बत्ती गुल, माणुसकी युवा ग्रुप घनसोली टीमने महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर, अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा !


नवी मुंबई ( विनोद वास्कर ) : मंगळवार दि. ०९ जुलै २०२४ रोजी महावितरण चे अधीक्ष अधिकारी संजय पाटील यांची माणुसकी युवा ग्रुप घणसोली टीमने भेट घेतली. या वेळी सचिन शेलार, ( मामू ) , संजय कोळी, संजय म्हात्रे, सिकंदर गायकवाड, राहुल शिंदे, आकाश पाटील या सर्वानी अधिकारा समोर समस्या माडल्या.

घणसोली मध्ये सुरू असणाऱ्या विजेच्या समस्येला सर्वस्वी जबाबदार आपले ऐरोली व रबाले चे अधिकारी आहेत. अंगा पेक्षा बोंगा म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक भार रोहीत्र व फिडर बॉक्सवर देण्यात येत आहे, तो कोणत्या तांत्रिक अभ्यास क्रमात शिकवल्या प्रमाणे मोडतो ते सांगा,

समर्थ नगर पाणी टाकी जवळ नवीन रोहीत्र बसविण्यात आला त्या रोहीत्रा वर लोड देण्यात का? आला नाही.आपले ठेकेदार महानगर पालीकेला पूर्व सुचना न देता रस्ते खोदून केबल टाकतात. बांधकाम व्यावसायिकांना ईमारत बांधकाम करताना व्यावसायिक मीटर देण्यात येत नाही. फिडर बॉक्सवर ओळखचीन्ह असावे त्याबाबत दुर्लक्ष तसेच फिडर बॉक्स सर्वे करण्यात हलगर्जीपणा,विधुत विभागाने २०२२ सालापासून घणसोली गावात बसविलेल्या रोहीत्रा बद्दल माहिती देण्यात यावी. अशा अनेक समस्यांचा पारा महावितरण अधिकाऱ्यांना म्हणून दाखवला. या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवावे नाहीतर आम्ही जन आंदोलन करू असा इशारा अधिकाऱ्यांना माणुसकी युवा ग्रुप घनसोली टीमने दिला. 

दररोज घणसोली गावामध्ये बत्ती गुल होणाऱ्या नाहक त्रासापासून नागरिकांना दिलासा द्यावा. फक्त आश्वासन नको तर करून दाखवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies