दिवा ( विनोद वास्कर ) : देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सूचनेने दिवा शहरात महिला मोर्चाच्या वतीने भाजप दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन रमेश भोईर आणि भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ''एक पेड माँ के नाम'' अंतर्गत दिनांक ९ जुलै २०२४ रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
त्यावेळी प्रभाग क्रमांक २८ चे अध्यक्ष रोशन प्रभाकर भगत आणि महिला मोर्चातीलप्रियांका माडभगत, पूनम तिवारी, पुनम शाल बेंद्रे, मनीषा शाल बेंद्रे, विनू बेन पडाया, सविता पाटील, सुलक्षणा कुडवे, पूजा जगताप, सुजाता माने, रुक्मिणी जोंधले, वनिता मगधुम , ममता दास, कल्पना पवार, साक्षी गावनकर, रेखा तिवारी, दिव्या शेलार, अवध राजभर ,सुरज पानसरे, अजित सातपुते अंकित गुप्ता व इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.