कल्याण दि. ०२, ( विनोद वास्कर ) : पुछता है डोंबिवलीकर! कारवाई कोणावर होणार, आमदार राजू पाटील यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीकांत शिंदे यांना ट्विट केले आहे.
पूछता है डोंबिवलीकर !
डोंबिवली मधील रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांची काम करून पुन्हा निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवत रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. नुकताच एमएमआरडीए च्या माध्यमातून डोंबिवलीच्या जिमखाना परिसरात रस्त्याचं काँक्रीट करण्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र आता निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवून पुन्हा काँक्रीटचा रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे. डोंबिवलीकरांसाठी मंजूर असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चुराडा होत असल्याने या बेजबाबदार पणाला जबाबदार कोण ? हे तर डोंबिवली कर विचारणार ना ? पुछता है डोंबिवलीकर ! कारवाई कोणावर होणार.