Type Here to Get Search Results !

आगासन गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील अन्यायकारक आरक्षण : ग्रामस्थांनी घेतली मा. आमदार सुभाष भोईर व आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वात पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे व विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांची भेट

दिवा:- आगासन गाव येथे शेतकऱ्यांच्या जमिनीवर ठाणे महापालिका प्रशासनाने अन्यायकारक पद्धतीने टाकलेली आरक्षणे रद्द करण्याबाबत ग्रामस्थांचा लढा सुरू असून याबाबत आगासन गावातील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व विरोधीपक्ष नेता अंबादास दानवे यांची पावसाळी अधिवेशनात भेट घेतली व याबाबत निवेदन देऊन पालिका प्रशासनाशी याबाबत चर्चा करावी अशी मागणी आगासन गाव संघर्ष अध्यक्ष व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली.


आगासन गावातील नागरिकांच्या लढ्याला या आधीच आगरी कोळी सामाजिक संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे.आगासन गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी ग्रामस्थांसह आगासन गावातील अन्यायकारक आरक्षणा विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व विरोधीपक्ष नेता अंबादास दानवे यांची भेट घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या कानावर टाकले. 

ग्रामस्थांच्या खाजगी जमिनीवर महापालिकेने मनमानी पद्धतीने आरक्षण टाकले आहे. या ऐवजी सरकारी जागा ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये सदर सोयी सुविधांसाठी जागा उपलब्ध करून ठेवाव्यात अशा पद्धतीची मागणी ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे केली आहे. एकाच ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनीवर आरक्षण टाकून अन्यायाची भूमिका घेण्यापेक्षा ज्या ठिकाणी जागा मोकळ्या आहेत व त्या पालिकेकडून आरक्षित आहेत त्या जागा ताब्यात घेऊन संबंधितांना योग्य तो मोबदला देऊन सदर सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी ही मागणी आगासनगाव संघर्ष समितीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व अंबादास दानवे यांना दिलेल्या पत्रात केली आहे. 

त्यांच्या बरोबर आगासन गाव संघर्ष समितीचे उदय मुंडे,शिवसेना शाखाप्रमुख उ.बा.ठा. पक्षाचे अनिकेत सावंत आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies