डोंबिवली ( शंकर जाधव) : कल्याण, भिवंडी, ठाणे व मुंबई येथे आमदाराचा भाचा असल्याचे सांगुन अनेकांची फसवणूक करणाऱ्याला विष्णूनगर पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय दत्ताराम तांबे ( 55, रा.शेलारगाव, भिवंडी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.ठाणे शहर आणि मुंबई येथे विजय विरोधात 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. विजयने आमदाराचा भाचा असल्याचे सांगून त्याच्या साथीदारासह अनेकांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपविजय भवर यांनी करत आहे.
सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, कल्याण परिमंडळ -3 चे पोलीस उपआयुक्त संजय गुंजाळ, मा. सहायकपोलीस आयुक्त कल्याणजी घेटे (कल्याण ).यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.निरीक्षक संजय पवार, पो.नि. गहीनीनाथ गमे, स.पो.निरी. लोखेडे, पो.उप.निरी. भवर, पोहवा पाटणकर, पो.हवा. पाटील, पोहवा मोरे, पो.हवा. जमादार, पोहवा भोसले, पोशि रायसिंग, पो.शि. साबळे, पो.शि. भाबड यांनी बजावली.