आ.डॉ. बालाजी किणीकर व मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याहस्ते करण्यात आले उद्घाटन
अंबरनाथ दि. २३ (नवाज वणू) : बँक ऑफ महाराष्ट्रच्या दोन शाखेंचा उदघाटन सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, बदलापूरचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी उपस्थिती लावली होती, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली, अंबरनाथच्या पूर्वेकडील आनंदनगर, एमआयडीसी येथील शाखेचे उदघाटन आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्याहस्ते करण्यात आले, तर बदलापूर पश्चिमेकडील बेलवली येथील शाखेचे उदघाटन कुळगांव बदलापूरचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याहस्ते करण्यात आले. अंबरनाथमधील शाखेचे उदघाटन झाल्यानंतर आ. किणीकर यांचे स्वागत शाखेचे मॅनेजर वामसी कृष्णा अर्धानी यांनी केले, तर बदलापूरमधील शाखेचे उदघाटन झाल्यानंतर मुख्याधिकारी गोडसे यांचे स्वागत शाखेचे मॅनेजर अंकुर कुमार यांनी केले.
ग्राहकांना होम लोन, कार लोन आदी सुविधासह बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना कशा पद्धतीने चांगली सेवा देता येईल, याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रित करणार असल्याचे ठाणे जिल्ह्याचे झोनल मॅनेजर राजकिशोर रंजित यांनी सांगितले.
याप्रसंगी आ. डॉ. बालाजी किणीकर, मुख्याधिकारी योगेश गोडसे, आमाचे अध्यक्ष उमेश तायडे, ठाणे झोनल मॅनेजर राजकिशोर रंजित, उद्योजक रूपा देसाई-जगताप, अंबरनाथ शाखेचे मॅनेजर वामसी कृष्णा अर्धानी, बदलापूर शाखेचे मॅनेजर अंकुर कुमार यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.