Type Here to Get Search Results !

करियर हे बागेसारखे बनवा ; उत्तम निर्णय उज्ज्वल भविष्य घडू शकतो - दिनेश गुप्ता , गोल्ड मेडलिस्ट मेकॅनिकल इंजिनिअर


नवी मुंबई दि. ०३, ( विनोद वास्कर ) : विजेता यशाचे मार्ग अफाट योग्य करियर देईल तुमची कायमची साथ ह्याच उद्देशाने आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थी आणि पालकांसाठी, करियर म्हणजे नक्की काय ह्यावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन उपाध्यक्ष भाजपा नवी मुंबई राजेश पाटील, आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या वतीने जुईनगर येथे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी विशेष मार्गदर्शन शिबिरामध्ये तज्ञ व्यक्तीकडून मोफत सल्ला, नकारात्मक विचारांवर विजय,यशस्वी होण्यासाठी वेगवेगळे मार्ग,स्वतःच्या व्यक्तिमत्त्व चा विकास , बदलत्या काळानुसार पटकन चांगला निर्णय घेण्याची तयारी आशा वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.. यावेळी एस व्ही. स्कूल न्यू कॉलेज संस्थापक अध्यक्ष/उपाध्यक्ष भाजपा नवी मुंबई डॉ राजेश पाटील, दिनेश गुप्ता गोल्ड मेडलिस्ट मेकॅनिकल इंजिनिअर, माजी परिवहन समिती सदस्य तथा माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, जीवनदिय प्रकारात सेल्फ मॅनेजर - गोरखनाथ पोळ,प्रदीप पाटील सभासद एस व्ही स्कुल,भाग्यश्री जाधव प्राचार्य एस व्ही स्कुल नेरुळ तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते. 

यावेळी गोल्ड मेडलिस्ट/ मेकॅनिकल इंजिनियर दिनेश गुप्ता यांनी विद्यार्थी आणि पालकांना सांगितले की करियर हे बागे सारखे बगीच्या प्रमाणे बनवा, तसेच १५ वर्षांपासून करियर चा विचार केला पाहिजे. सध्या डिजिटल चे युग हे ऑइल प्रमाणे आहे. मोबाईल च्या युगात सुद्धा विद्यार्थी आज करियर मार्गदर्शन अगदी मन लावून ऐकत होती आणि नक्कीच त्याचा फायदा ह्या विद्यार्थ्यांना होईल.

करिअर कार्यक्रम हे नेहमीच घेत असतो. सध्या ती काळाची गरज आहे. १० वी १२ वी हा मुख्य पाया आहे. स्पर्ध्येच्या युगात पालक आणि विद्यार्थी यांनी महत्वाचा निर्णय घेणे गरजेचा आहे. निर्णय चांगला घेतला तर नक्कीच उज्ज्वल भविष्य घडू शकते. - राजेश पाटील- उपाध्यक्ष भाजपा नवी मुंबई. या कार्यक्रमादरम्यान दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार देखील करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies