पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंची काल भेट घेत या स्पर्धेत चांगल्या कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
आपले खेळाडू या स्पर्धेत त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीचं प्रदर्शन करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आपल्या कामगिरीनं हे खेळाडू भारताचा गौरव वाढवतील. म्हणूनच त्यांचं यश १४० कोटी जनतेला प्रेरणा देतं, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
यावेळी पंतप्रधानांनी पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि सर्वच खेळाडूंना मार्गदर्शनही केलं. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी.टी. उषा देखील उपस्थित होत्या.