भाजपा दिवा मंडळ महिला अध्यक्ष सपना रोशन भगत यांच्या वतीने ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन
दिवा ( विनोद वास्कर ) : भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुळे व ठाणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा मंडळ महिला अध्यक्ष सपना रोशन भगत यांच्या तर्फे , ठाणे शहर पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे यांना निवेदन देण्यात आले.
दिवा शहरात ५ ते ६ लाख लोकवस्ती आहे . महिलांवर होणारे अत्याचार , त्यांची होणारी छेडछाड , तसेच विनयभंग अशा अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहेत. आणि या सर्व कारणांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणी वरती आलेला आहे. त्यामुळे ग्लोबल शाळेजवळ असलेल्या पोलीस स्थानकात महिला पोलिस नसल्यामुळे अनेक वेळा महिला वर्गातून कोणतेही खाजगी तक्रार असेल तर अनेक अडचणींना सामना करावा लागतो. त्या अनुषंगाने दिवा पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी नियुक्ती करण्यात यावी. या साठी गुरुवारी ठाणे शहर पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे यांना भेटून पत्र व्यवहार करण्यात आला.
यावेळी ठाणे जिल्हा महिला सरचिटणीस रितू सिकॉन , ठाणे कार्यकारणी सदस्य पुनम तिवारी , मनीषा शालबेंद्रे इ. उपस्थित होते.