पंढरीच्या ओढीनं आषाढवारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम विविध सामाजिक संस्था तसंच व्यक्ती आपापल्या परीनं करत आहेत. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानंही वारकऱ्यांसाठी औषधं उपलब्ध करुन दिली आहेत. तसंच निसर्गोपचार मसाज करुन घेण्याची सोयही वारी दरम्यान उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश इथले तज्ज्ञ वारकऱ्यांची सेवा करीत आहेत