Type Here to Get Search Results !

कोपरखैरणे विभागात अनधिकृत रेस्टॉरंट व बारवर धडक कारवाई


नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील 41 अनधिकृत रेस्टॉरंट, बार, पब यावर 30 जूनच्या रात्रीपासून पहाटेपर्यंत केलेली धडक कारवाईची मोहीम 1 जुलै रोजी रात्रीही कायम ठेवत कोपरखैरणे विभागांतर्गत (1) रुचिरा रेस्टॉरंट अँड बार, सेक्टर-2, कोपरखैरणे, (2) शंकर रेस्टॉरंट अँड बार, सेक्टर-3, कोपरखैरणे, (3) सम्राट रेस्टॉरंट अँड बार, सेक्टर-6, कोपरखैरणे, (4) स्पायसेस रेस्टॉरंट अँड बार, सेक्टर-3, कोपरखैरणे येथील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत.

या अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी / कर्मचारी व 16 मजूर यांनी 01 गॅस कटर, 05 ब्रेकर, 1 जे.सी.बी, 1 पीकअप व्हॅन या साहित्यासह पोलीस पथकाच्या उपस्थितीत ही धडक कारवाई केली.

यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies