गगनबावडा : माजी गृह राज्यमंत्री तथा आमदार सतेज (बंटी )पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुटकेश्वर तालुका गगनबावडा येथील नवदुर्गा बचत गटातर्फे उज्वल गॅस योजना वाटप करण्यात आले.
नवदुर्गा बचत गटाच्या अध्यक्ष सौ क्रांती तानाजी पाटील,उपाध्यक्ष सौ स्नेहल मानसिंग पाटील यांच्या प्रयत्नातून गावातील ज्या महिला या योजनेपासून वंचित होत्या, ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती नव्हती अशा 65 महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला . यापैकी आज 35 महिलांना गॅस टाकी व शेगडी वाटप झाले.
बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे गावामध्ये विविध योजना आणून असेच सामाजिक कार्य करत राहू असे सांगण्यात आले .
यावेळी उपस्थित चेअरमन आनंद पाटील, महादेव पाटील, सर्जेराव पाटील व सचिन पाटील, विलास पाटील, तानाजी पाटील यांनी सहकार्य केले.