डोंबिवली ( शंकर जाधव ) : बदलापूर मध्ये चिमुकलीवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती.पोलीस चकमकीत अक्षय शिंदे यांच्या मृत्यू झाला.याबद्दल राज्यात सर्वस्तरातून पोलिसांचे कौतुक होत आहे. डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून जल्लोष केला.'देवा के दरबार में न्याय मिलेगा! असे म्हणत देवा भाऊ अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले.
यावेळी भाजपा कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर (नंदू) परब, कल्याण महिला मोर्चा अध्यक्षा रेखा चौधरी, सरचिटणीस अर्चना सुर्यवंशी, डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा मनिषा राणे, राजत्री राजपुरोहीत, बिना गवस, निर्मल मानकर,भारती गढवी, सुर्वणा कुमार, तेजश्री आंगणे, धनत्री बिडये, संगीता देशमुख, साक्षी गुजर, अदिती सावंत, अनामिका मयेकर, करिश्मा प्रताप, नीतू मौर्य, मथु राय यांच्या सह कल्याण ग्रामीण विभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालय उपस्थित महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी' आमच्या देवाभाऊनी न्याय दिला','भाजपा झिंदाबाद, देवेंद्र फडणवीस आगे बढो हम आपले साथ है, अशा घोषणा देऊन कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर (नंदू) परब यांना पेढे भरवून नंदू दादा झिंदाबाद असा जयघोष केला.
यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर (नंदू) परब यांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देऊन अक्षय शिंदे यांचा शेवट असाच होणे अपेक्षित होतं असं सांगितले. महिलांनी हा जल्लोषाचा कार्यक्रम केला तो अभिमान वाटणारा असाच आहे. त्या छोट्या मुलींसह महिलांना भाजपामुळे न्याय मिळला. तर मनीषा राणे म्हणाल्या पोलिसांनी ठार केलं हा चांगला निर्णय झाला. महायुतीच्या सरकारमध्ये लहानमुलीपासून ते वयोवृद्धपर्यंत ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहचल्या आहेत. सरकारवर सर्व जनता खुश आहे त्यामुळे हे महायुतीचे सरकार पुन्हा नक्कीच येईल असा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.