नवी मुंबई : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांताच्या वतीने शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी महिला साहित्यिक संमेलनाचे आयोजन विवेकानंद संकूल, सानपाडा येथे आयोजित करण्यात आले असून एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डाॅ. उज्ज्वला चक्रदेव व लेखिका सौ. स्वाती काळे या संमेलनात अनुक्रमे उद्घाटक व प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
संमेलनात कथा, कादंबरी, विनोदी साहित्य व काव्य या साहित्यिक प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. तसेच एक लेख स्पर्धाही आयोजित केली आहे महाराष्ट्रातील सर्व महिला साहित्यिकांनी या संमेलनात आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन संयोजिका डाॅ. अरुंधती जोशी यांनी केले आहे.
संमेलनाच्या आधिक माहितीसाठी संपर्क
डाॅ. अरुंधती जोशी +919833547732
मीनल वसमतकर+919867020190
नंदा कोकाटे +919076006105.