ठाणे ( विनोद वास्कर ) : साई धनवर्षा फाउंडेशन नाशिक संचलित शैक्षणिक, सामाजिक, शासकीय, संस्कृतिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. २० ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रोटरी हॉल गजमाल बस स्टॉप समोर जैन मंदिराच्या मागे सहजीवन नगर, नाशिक १ येथे आयोजित करण्यात आले होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या सर्वांनी उपस्थिती लावली. अजय बांबुल (जिल्हाप्रमुख श्रमिक सेना नाशिक युवा नेतृत्व), रामराव शिंदे (ज्येष्ठ समाजसेवक प्रोप्रायटर विकास इंटरप्राईजेस नाशिक), ज्ञानेश्वर वरपे (डायरेक्टर ऑल महाराष्ट्र रोड लाईन्स श्री महाराष्ट्र लाॉजी स्टीक्स), राधाकृष्ण नाईकवाडे ( संचालक श्री समर्थ सहकारी बँक लि. नाशिक स्थापक चेअरमन शरयू ताई नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबड नाशिक),मिनू धाम (अमोल मास्टर चीफ इंडिया टॉप फायनल ईस्टर सीजन ४ स्टार प्लस गेम), डॉ.आशा पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती नाशिक), ज्योती शिंदे (ग्रामपंचायत अधिकारी वाकी ता. इगतपुरी, जिल्हा नाशिक फेस ऑफ नाशिक मिसेस नाशिक २०२१), कावेरी घुगे (मा. सभापती व बालकल्याण विकास तथा नगरसेविका प्रभाग क्रमांक २७ नाशिक), रामसिंग राजपूत (राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र वरिष्ठ प्रभारी नाशिक),विजय घरत (सस्थापक अध्यक्ष, विठ्ठल रुक्माई मंदिर मु. पो. चितेगाव मा. कर्जत जि. रायगड), विश्वनाथ किरकिरे (महासचिव महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस), ज्योती शिंदे ग्रामपंचायत अधिकारी वाकी तालुका इगतपुरी नाशिक विभाग मिसेस युनिव्हर्स विनर २०२४) आणि साई धनवर्षा फाउंडेशन नाशिकचे सर्व सदस्य उपस्थित होते.
साई धनवर्षा फाउंडेशन नाशिक चे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते उषा मुंडे यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानाने गौरवण्यात आले .उषा मुंडे ह्या आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आगासन दिवा याच्यामध्ये अध्येक्षा म्हणून कार्य करत आहेत. दिवा शहरातील नागरिकांचे समस्या, महिलांचे प्रश्न सोडवत आहेत, केंद्र सरकार राज्य, सरकार योजना, नागरिकांना कशा मिळतील यासाठी त्यांचा प्रयत्न नेहमी असतो. याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन साई धनवर्षा फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला. त्यांना श्रीफळ शॉल, प्रमाणपत्र, टॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. दिव्यांग महिला असून सुद्धा समाजासाठी त्यांचं काम खूप चांगल आहे. त्यामुळेच त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लाडकी बहीण योजनेचे सुद्धा फॉर्म भरून त्यांनी महिलांना दिले आहेत. आणि त्यांना पैसे मिळून सुद्धा दिले आहेत. तसेच महिलांसाठी बचत चालू केले आहेत महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्याने अनेक उपक्रम राबवले आहेत. पुढेही राबवत राहणार आहेत.
साई धनवर्षा फाउंडेशन नाशिक तर्फे महाराष्ट्रातील ५१ महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. उषाताई मुंडे (आगासनगांव, दिवा, ठाणे) शालिनी पाटील (पारोळा), वर्षा पाटील(रावेर), विजयालक्ष्मी अहिरे (मालेगाव), डॉ. मानसी महाजन (मालेगाव), शिवकण्या अश्विनी देशमुख (मालेगाव),माया उगले ( पिंपळगाव बसवंत), सपना पवार( पिंपळगाव बसवंत),नीलिमा गायमुखे (पि. बसवंत), संगीता जाधव (देवळा), वैशाली पगार (कळवण) ,माया फुलमाळी ( मनमाड), वैशाली पाटील ( सिन्नर), पल्लवी शिंदे (घोटी, इगतपुरी) , संगिता निकाळे ( मनमाड), दिपाली गणेश नागपुरे (येवला), अनुपमा मढे (येवला),प्रियंकाताई जऱ्हाड (येवला), संगिता गुंजाळ (लासलगाव), रजनी राजदेकर (त्र्यंबकेश्वर), प्रिया ढेरगे (त्रंबकेश्वर), चित्रा श्रावणी कामत (लोणावळा), शितल संखे (पालघर),सुचित्रा रोठे (पालघर), शीला त्रिभुवणे (दिवा ठाणे), सुवर्ण कदम (दिवा, ठाणे), श्रीमती प्रतिभा खर्डीकर (शहापूर), सोना वारघडे (शहापूर), वंदिता निंबाळकर (अंबरनाथ), आरती योगेश शेळके ( दिडोरी), कांचन राजेंद्र जाधव ( दिंडोरी), संगीता दाणी ( उज्जैन), अलका राचलकर ( नागपूर), किरण सोळंके (परभणी),सुलभा साळवे (परळी), चित्रा देशपांडे (परळी), अर्चना शर्मा (नांदेड), लिना पेंढारकर (बेंगलोर), कल्पना चव्हाण (गुजरात), मोहिनी धुमाळ ( रायगड), स्वाती आफळे (अलिबाग), आशाताई कांबळे (सातारा), जयश्री (कुतवळ, सातारा), पद्मावती कळसकर (सातारा), स्वाती पाटील (कोल्हापूर), मनीषा चव्हाण( कोल्हापूर), संगिता नरके ( कोल्हापूर), वाती सुर्यवंशी (जळगाव), प्रतिमा खटी (नागपूर), मीरा तांबे( संभाजीनगर), ललिता कृष्णाराज पाटील (पाचोरा)