Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कडक खाकी वर्दी आड मायेचा ओलावा : गरीब विद्यार्थ्यांची दिवाळी केली आनंदी व गोड; पोलिस उप निरिक्षक बबनराव पाटील अंबरनाथ यांचे दातृत्व


पारोळा : कडक खाकी वर्दीच्या आतही एक संवेदनाक्षम मन , हृदय , माया , ममता व सामाजिक बांधिलकी वास करीत असते याचे आदर्श उदाहरण म्हणजे भातखेडे ता एरंडोल जि जळगाव गावाचे सुपुत्र बबनराव माधवराव पाटील , पोलिस उप निरिक्षक, शिवाजी नगर , अंबरनाथ यांनी जि प शाळा क्र ३ पारोळा मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या माध्यमातुन शाळेच्या गोरगरीब ३६ विदयार्थ्यांना आपल्या मातोश्री गं . भा . स्व . यशोदा माधवराव पाटील यांच्या स्मृती स्मरणार्थ छान सुंदर नवे कपडे , दिवाळी फराळ व मिठाई भेट देत त्यांची दिवाळी आनंदी व गोड केली .

आज शाळेवर आयोजित या उपक्रमाचे अध्यक्ष पारोळा केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवाजी माधवराव पाटील , उप सरपंच तथा विकासो चेअरमन भातखेडे , शामकांत युवराज पाटील , पोलिस पाटील , मनोहर बळीराम पाटील , सरपंच , गुणवंतराव माणिकराव पाटील , मा सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष हणमंतखेडे सिम , विशेष शिक्षिका वर्षा पाटील , निवृत्त आदर्श मुख्याध्यापक गुणवंतराव पाटील , नितीन शिंपी हे उपस्थित होते .

अगोदर गं . भा . स्व यशोदा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी त्यांना अभिवादन केले . वरील मान्यवरांच्या शुभहस्ते कपडे , फराळ व मिठाई वाटप करण्यात आली . यावेळी विद्यार्थ्यांना कमालीचा आनंद झाला होता . मागच्या दिवाळीला सुद्धा बबनराव पाटील यांनी हिवरखेडे बु॥ येथिल ६० आदिवासी विदयार्थ्यांना दप्तर व फराळ भेट दिले होते .

यावेळी गुणवंतराव पाटील यांनी भातखेडे येथिल बबनराव पाटील यांचा परिवार व त्यांची समाजिक बांधिलकी याचे कौतुक केले . जिल्हा परिषद शाळेच्या गोरगरीब बालकांच्या मदतीसाठी समाजातील असे दाते महान असतात . बबनराव पाटील यांचा आदर्श सर्व सक्षम मान्यवरांनी घ्यावा असे नम्र आवाहन त्यांनी केले .

यावेळी केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत म्हणाले की पोलिस कर्मचारी व अधिकारी यांचे सण जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावण्यात जातात . पण त्यावरही मात करीत गोरगरीब बालकांची दिवाळी आनंदी व गोड करून बबनराव पाटील यांनी त्यात आपला आनंद मानला . कडक खाकी वर्दीआड माणुसकीचा ओलावाही असतो हे त्यांनी दाखवुन दिले त्यांचे अभिनंदन व आभार .

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपाली पाटील तर आभार प्रदर्शन अर्चना सेवलीकर यांनी केले . या उपक्रमाला स्वप्निल राणे , निलेश न्हावी , नयना मराठे , भावेश साळुंखे यांचे सहकार्य लाभले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |