Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन


ठाणे दि. २७  - मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मार्फत प्रोजेक्ट दिशा व्ही स्कूल पोर्टल द्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी कामकाज करण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक जि प ठाणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठाणे यांच्या वतीने प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हास्तरीय शिक्षण परिषद दि. २६ डिसेंबर, २०२४ रोजी बी. जे. हायस्कूल, ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती. शिक्षण परिषदेत जिल्ह्यातील ३३ अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांना दिशा प्रोजेक्ट तर्फे उत्कृष्ट कामकाज केल्याबाबत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

'प्रोजेक्ट दिशा' या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार विकास करण्यासाठी एआय, गेमिंग तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी विविध कृती साहित्याचा वापर करावा. आपल्या विद्यार्थ्यांचे कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने कसे शिकतील यासाठी प्रयत्न करावे. आणि मागील पाच महिन्याचा आराखडा पाहता विद्यार्थ्यांची प्रगती दिसून येत असली तरी गोष्ट स्तरापर्यंत विद्यार्थ्यांला जाण्यासाठी मदत करावी, ज्या प्राथमिक शाळा व शिक्षकांनीतसेच पर्यवेक्षिय यंत्रनेने उत्तमप्रकारे कामकाज केले आहे आज त्याच कौतुक करताना आंनद होत आहे,तरी इतर सर्व शिक्षकांनी पुढाकार घेऊन कामकाज करावे, असे मार्गदर्शन शिक्षण परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित सर्व शिक्षकव पर्यवेक्षिय यंत्रणा यांना केले. विविध उपाययोजना करून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी मोलाची कामगिरी करावी, अशी अपेक्षा देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केली.

यावेळी विश्वस्त मोरडे फुड्स पुणे हर्षल मोरडे, वोपा सामाजिक संस्थेचे प्रफुल्ल शशिकांत व ऋतुजा जेवे, प्राचार्य डायट डॉ. संजय वाघ, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहीतुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी योजना भावना राजनोर, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, समग्र मधील कर्मचारी,सर्व तालुका गट शिक्षणाधिकारी व पर्यवेक्षिय यंत्रनेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना १ ली ते ४ थी पर्यंत शिक्षण उत्तम पद्धतीने शिक्षण देणे गरजेचे आहे यासाठी शभंर टक्के शिक्षकांनी प्रयत्न करावे तसेच अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन डायटचे प्राचार्य संजय वाघ यांनी केले.

शिक्षण विभागातील विविध कामासंदर्भात तसेच जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना वाचन, लेखन‌ व गणित जलदगतीने करता यावे व शिक्षण क्षेत्रात बदल व्हावा यासाठी फंड देण्यात येत असून समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन जाताना सजग नागरिक आपण घडवण्यासाठी कामकाज करतोय ही अभिमानाची बाब आहे. वोपा टिमच्या भेटी असेल नावीन्यपूर्ण गोष्टी शिकायला सुरुवात केल्यामुळे शिकण्याची इच्छा जास्त असते. विद्यार्थी लहान वयात सहा भाषा शिकू शकतात. त्यांची आकलन क्षमता जास्त असते. तंत्रज्ञान व शिक्षकांच्या मेहनतीमुळे शिक्षण क्षेत्रात बदल होताना दिसत आहे. शिक्षक सुध्दा या प्रक्रियेत शिकत आहे. विद्यार्थांच्या आकलनाचे मोजमाप तंत्रज्ञानाच्या मदतीने होतंय. आमच्या कंपनीकडून सीएसआर फंडद्वारे हे काम काज करतोय. बदल आणि सातत्य या दोन गोष्टींमुळे शिक्षण क्षेत्रात मोलाचे बदल होत आहे, असे मोरडे फुड्स पुणे हर्षल मोरडे यांनी मत व्यक्त केले.

शिक्षक यांनी मराठी, गणित, इंग्रजी विषय शाळेत शिकवण्यासाठी घेतलेल्या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांना अक्षर ओळख करून देण्यासाठी विविध पध्दतीची अंमलबजावणी करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमाची माहिती चे स्टोल विविध साहित्यासह लावण्यात आले होते त्यातून विद्यार्थी अध्ययन अध्यापन कसे केले जाते याची माहिती दिली.‌ दिशा प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांची प्रगती पुढच्या टप्प्यावर गेली असून त्यामुळे सर्वांना यांची प्रचीती झाले आहे. शैक्षणिक साहित्य आणि वातावरण निर्माण करण्यासाठी दिशा प्रकल्पाद्वारे काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली, असे वर्गशिक्षक यांनी मत व्यक्त केले.‌

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |