Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

वाशी येथे नवी मुंबई वैधमापनशास्त्र यंत्रणा विभागाकडून जनजागृतीद्वारे राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन 2024 संपन्न


ठाणे,दि.24 :- राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभाग तसेच वैधमापनशास्त्र यंत्रणा विभाग, नवी मुंबई यांच्यामार्फत वाशी येथे नागरिकांना ग्राहक हक्कांविषयी तसेच वस्तूंवरील वजन इ. माहितीबाबत जनजागृती करण्यात आली.

बाजारात विक्रीसाठी असणाऱ्या वस्तूंच्या आवरणावर एमआरपी, वजन, उत्पादनाची तारीख, पॅकेर्सवर पूर्ण पत्ता, ग्राहक, ई-मेल, दूरध्वनी क्रमांक इ. प्रिंट करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र नागरिक या सूचना तपासून घेत नसल्याने अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. महाराष्ट्र शासनाचा वैधमापनशास्त्र विभाग अशा व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवते. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची व विक्रेत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी दरवर्षी दि.24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ग्राहकहिताची जनजागृती करणारे कार्यक्रम राबविले जातात. या जनजागृतीचा एक भाग म्हणून वैधमापन शास्त्र विभागाच्या वतीने स्टॉल लावून वजनकाटे, मापे, आवेष्ठित वस्तू उत्पादनांवरील आवश्यक माहिती इ. बद्दल प्रात्याक्षिके माहितीसह देण्यात आली. तसेच ग्राहक जनजागृती माहितीपत्रके वाटण्यात आली.

हा कार्यक्रम वैधमापनशास्त्र यंत्रणा उपनियंत्रक, ठाणे जिल्हा क्रमांक 2 सुहास कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी 1 आणि 4 विभागाचे निरीक्षक एम. एच तडवी, वाशी 2 विभागाचे निरीक्षक हेमंत कुलथे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षेत्र सहाय्यक अनंत पाडवी, कर्मचारी रमाकांत गाडेकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनी नागरीकांनी उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच उपयुक्त माहिती मिळाली म्हणून यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |