दिवा : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर आयोजित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मोफत शिबिराचे आयोजन शहर प्रमुख सचिन पाटील, माजी नगरसेविका अंकिता पाटील, युवासेना शहर अधिकारी अभिषेक ठाकुर, विभाग संघटीका मयुरी पोरजी यांच्या मार्फत साबे चौक येथे करण्यात आले .
शिबिरास शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाला उपशहरप्रमुख तेजस पोरजी ,विधानसभा संघटीका योगिता नाईक,शहर संघटीका ज्योती पाटील , शहर समन्वयक प्रियांका सावंत,उपशहर संघटीका स्मिता जाधव, तृप्ती पाटील तसेच विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व सर्व पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
सदर शिबिर दिनांक २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर या दरम्यान ठेवण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ दिवेकर नागरिकांनी जास्तीत जास्त घ्यावा असे आवाहन शहरप्रमुख सचिन पाटील यांनी केले आहे .