मुंबई : घाटकोपर पश्चिम कडील माणिकलाल येथे हार्ट अँड वेस्कुलर रुग्णालयात हृदयावरील शस्त्रक्रिये करिता उपचार रुग्ण रमेश वासू बोवणे राहाणार वाशी गाव चेंबूर दाखल केले होते. डॉ मेघव मनोज शाह,यांच्या देखरेखी खाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर रुग्णाला उपचार झाल्यावर बिल देण्यात आले, जवळपास ३ लाख रुपयाचे बिल पाहून रुग्णाचे बंधू निर्मल बोवणे यांना धक्का बसला. निर्मल यांनी शिवसेना भवन येथे उपनेते नितीन नांदगावकर यांच्याकडे मदत मागितली. नांदगावकर यांनी सदर प्रकरण शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्व्यक प्रकाश वाणी व विधानसभा संघटक सचिन भांगे यांच्या कानावर घातले.
सदर प्रकरणाचे गांभीर्य पाहून वाणी व भांगे यांनी शिव आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. शुभा राऊळ, कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर,समन्व्यक जितेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात धाव घेतली. संबंधित डॉक्टर मेघव शाह व परिचारिका श्रद्धा रुके यांच्या सोबत सुवर्णंमध्य काढत रुग्णाला बिलात मोठी सवलत मिळवून दिली. रुग्णाच्या नातेवाईकांनी डिस्चार्ज घेत शिव आरोग्य सेनेचे आभार मानले