Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

स्वामी सवितानंदजी लिखित "शुद्ध बीजापोटी" ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन


ठाणे,दि. २५ (प्रतिनिधी) : परमपूज्य स्वामी श्री सवितानंदजी लिखित 'शुद्ध बीजापोटी' या सोळा संस्काराची वैज्ञानिक पार्श्वभूमी उलगडून दाखवणाऱ्या अभिनव पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा. पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका मुख्यालयातील कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 

जनशक्ती बहुद्देशिय संस्थेच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात परमपूज्य स्वामी श्री सवितानंद यांचे "आपण हिंदू आहात का ?" या विषयावर प्रवचन देखील होणार असुन प्रवचनानंतर प्रश्नोत्तरे देखील होणार आहेत. 'शुद्ध बीजापोटी' या ग्रंथामध्ये स्वामींनी, माता पिता बनू इच्छिणाऱ्या विवाहित दांपत्यांना गर्भाधान व अन्य संस्कारांची आवश्यकता, उपयोगिता महत्त्व आणि युगानुरुपता स्वामीजींनी आपल्या सुबोध शैलीत विशद केली आहे. आधुनिक वैज्ञानिक संदर्भ संशोधन यांच्या साह्याने जागोजागी स्वानुभवाचे दाखले देत वाचकांना उपयुक्त ठरणारी माहिती देणारा हा ग्रंथ वाचकांना निश्चित उपादेय ठरेल असे या ग्रंथाच्या प्रस्तावनेत स्वामी श्री गोविंददेवजी गिरी महाराज यांनी म्हटले आहे. आज भारताची विशेषतःआपल्या हिंदुधर्मीय समाजाची सर्वात मोठी तापदायक समस्या ; संस्कारहीन कुप्रथा ही हिंदुधर्मापुढील सर्वात मोठा तितकाच दाहक ज्वलंत प्रश्न आहे. 

समाज, देश व धर्माची हानी आणि याला मुख्य कारण गर्भाधान संस्काराची अज्ञानता, उपेक्षा व दुर्लक्ष होय. स्वामीजींनी याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपली सनातन संस्कृती आणि आधुनिक विज्ञान यांची सुंदर सांगड घालून या पुस्तकाचे लेखन केले आहे. या निमित्त परमपूज्य स्वामीजींचे "आपण हिंदू आहात का"? या विषयावरील प्रवचनाचे देखील आयोजन करण्यात आले असुन यासोबतच 'सल्ला आमचा निर्णय तुमचा' या छोट्या पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. 

सुप्रजनन व त्यातील अडचणी यासंबंधी परमपूज्य स्वामीजींचे मौलिक विचार या पुस्तिकेत संकलित केले आहेत. या प्रकाशन सोहळ्यास श्री आनंद स्वामी, सु.श्री. अलकाताई मुतालिक, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क - अनिल शिंदे (९८२१२४८८९९) व मनोज मसुरकर (९७०२७०५२९५)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |