Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

आमदार मोरे यांचे आजदेपाडा व आजदेगाव येथील पाणी प्रश्न सोडविण्याचे प्रशासनाला आदेश


डोंबिवली ( शंकर जाधव ) :
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील 27 गाव, 14 गाव व दिवा शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी आमदार राजेश मोरे हे सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. दत्तजयंतीला संदप गावात गेले असता आमदार मोरे यांनी अमृत योजनेचे प्रोजेक्ट मॅनेजर चेतन मोरे यांच्याशी चर्चा करून गावातील पाणी प्रश्न लवकरत लवकर सोडवावा असे निर्देश दिले.

 सोमवार 23 तारखेला डोंबिवली पूर्वेकडील आजदेपाडा येथील आयप्पा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर येथील माजी सरपंच जयंता पाटील यांनी आजदेगाव व आजदेपाडा येथील पाणी समस्येवर चर्चा केली. यावेळी आमदार मोरे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील डोंबिवली विभागातील पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कुलकर्णी यांना फोन करून आजदेगाव व आजदेपाडा येथील पाणी पुरवठा संदर्भात माहिती घेत लवकरात लवकर पाणी प्रश्न दूर करण्याचे निर्देश दिले. तर स्व. बाबुराव पाटील नगर मधील मल्हार बंगला ते रुद्र अपार्टमेंट पर्यत नवीन पाईपलाईन टाकण्यास सांगितले. 

यावेळी शिवसेना पदाधिकारी बंडू पाटील, उमेश शेलार, मनोज मोरे, वैभव मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |