कल्याण (संजय कांबळे) : कल्याण मध्ये दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलेल्या१३वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यावर तिची हत्या करून तिचा मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून यामुळे कल्याण शहर हादरून गेले आहे. सतत च्या गुन्हेगारी घटनामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत.
कल्याण पुर्वेला चक्की नाका परिसरात राहत असलेली १३वर्षीय मुलगी बाजूच्या दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली ती परत आलीच नाही. तिच्या कुंटूबियांनी बराचवेळ तीचा शोध घेतला पण ९तासानंतर देखील परत न आल्याने घाबरलेल्या घरच्या नी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता दुसऱ्या दिवशी ही मुलगी कल्याण नजीकच्या बापगाव परिसरात कब्रस्तान जवळ मृतावस्थेत आढळून आली.तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. यामध्ये सहभाग असलेला रिक्षा चालकाला ताब्यात घेतले असून यातील मुख्य आरोपी विशाल गवळी याला शेवगाव येथून ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची पत्नी हिला देखील अटक केली आहे. या आरोपीच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत,
या प्रकारामुळे कल्याण हादरले असून या विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, तसेच विविध संघटना या विरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे, तसेच मागील बदलापूर घटनेचे गांभीर्याने ओळखून लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे हे स्वतः विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तळ ठोकून बसले आहेत, सर्व घटनावर लक्ष ठेवून आहेत.