डोंबिवली ( शंकर जाधव ) : खडवली रेल्वे स्टेशन फलाट क्र. 1 वर उतरुन रेल्वे रुळावरुन कसारा बाजुकडे चालताना एका वृद्धाला मारहाण करून तिच्याकडील गळयातील सोन्याच चैन,पॅन्डल व हातातील मोबाईल फोन हिसकावून चोरांनी पळ काढला. ही घटना बुधवार 8 तारखेला दुपारच्या सुमारास घडली.घाबरलेल्या महिलेने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोघा चोरांविरोधात गुन्हा नोंदविला. कल्याण रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्यातील चोरांचा शोध घेऊन अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर अभिमन्यु शिरसाठ (38, व्यवसाय-मजुरी, रा. हनुमान गल्ली, रुम नंबर 3, साईधाम मित्र मंडळ, कांजुर मार्ग, (पुर्व) मुंबई. मुळगांव- पैठण, ता. कन्नड, जि.औरंगाबाद) 2) नरेंद्र सिंग रामेश्वर गौतम ( 28 वर्षे, रा.रुम नं 2, शनिमंदिर चे बाजूची झोपडपट्टी, जया बाई हायस्कूलच्या बाजूला, विठ्ठलवाडी, पुर्व) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.फिर्यादी वृद्ध हा बुधवार 8 तारखेला दुपारच्या सुमारास खडवली रेल्वे स्टेशन फलाट क्र.1 वर उतरुन रेल्वे रुळावरुन कसारा बाजुकडे चालत असतांना दोन अनोळख इसमांनी फिर्यादी यांचे पाठमागून येऊन त्यांना मारहाण करुन त्यांचे गळयातील सोन्याचे चैन, पॅन्डल व हातातील मोबाईल फोन जबरीने खेचून पळाले.पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तापसले असता दोघांची ओळख पटली. कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक करून गजाआड केले. पोलिसांनी दोघांकडून मोबाईल फोन व सोन्याची चैन व पॅन्डल हस्तगत केली.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, मध्य परिमंडळ मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त मध्य परिमंडळ कल्याण विभाग अरुण पोकरकर, वपोनि पंढरी कांदे यांचे मागदर्शनाखाली पोउपनि शंकर पाटील, पोउपनि संजय मडव, पोहवा कुटे, पोहवा मोहिते, पोना इंगवले, पोशि पाटील, पोशि सुर्यवंशी, पोशि तांबोळी, मपोशि जगताप यांनी बजावली.