ठाणे दि. १७, ( विनोद वास्कर ) : नारिवली गावातील महिलांनी दिली धडक शिळ-डायघर पोलीस स्टेशनला धडक देण्याचे कारण सुद्धा तसेच आहे. नारिवली गावांमध्ये घरफोड्या होत असल्यामुळे महिलावर्ग घाबरला आहेत. ''आपण आमच्या नारिवली गावामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी'' यासाठी नारिवली गावातील महिलांनी शिळ-डायघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ यांची भेट घेतली. गावामध्ये पाच ते सहा घरफोड्या आतापर्यंत झाले आहेत. आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर चोरट्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. आणि पोलिसांची गस्ती वाढवावी अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.
सतत घर फोड्या होत असल्यामुळे लहान मुलांमध्ये, महिलांमध्ये नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. घरचा पुरुषमंडळी कामावर गेल्यामुळे रात्री घरात राहायला आता भीती वाटते आणि लहान मुले सुद्धा घाबरतात. पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर दररोज तुमच्या गावांमध्ये गस्तीसाठी पोलीस येतील असे आश्वासन देण्यात आले.
लवकरच गुन्हेगारांना आम्ही पकडू आणि त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करू. असे वरिष्ठांनी सांगितले. अशी माहिती स्नेहा मुंढे यांनी दिली.