हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंती निमित्ताने समर्थ प्रेरणा प्रतिष्ठान च्या वतीने विद्याविहार येथे साहेबांचे हस्तशिल्प संकल्प सिद्धिस नेले जात आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय पाटील, विभागप्रमुख सुरेश पाटील,डोंबिवली संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांच्या सहकार्याने व उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, रवींद्र कोठावदे यांच्या हस्ते हस्तशिल्पाचे संकल्प सिद्धिस नेण्याचे योजिले आहे लवकरच याचे संकल्पसिद्धी करत उदघाटन करून घेण्यात येणार आहे.
या शुभप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास लिगाडे,मा.शाखाप्रमुख नंदकिशोर परुळेकर,समन्व्यक प्रसाद कामतेकर, शिव आरोग्य सेनेचे विधानसभा संघटक सचिन भांगे, विशाल चावक,गणेश परब,योगेश मोर्या,चंद्रकांत हळदणकर, दिपक आंबोलकर व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.