ठाणे/शिळफाटा ( विनोद वास्कर ) : सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ ते २९ जानेवारी २०२५ रोजी हरिनाम कीर्तन सोहळाचे शिळगांवमध्ये वेशी आई मंदिर, शिळगांव, पोस्ट पडले, ता.जि ठाणे या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हरिनाम कीर्तन सोहळ्याला १२ वर्षे पूर्ण होत आहे. एक तपोवन पूर्ण होत आहे.
ह.भ.प.वै.स्व वामन बाबा, ह.भ.प.वै.स्व.सावळाराम बाबा महाराज, ह.भ.प.वै.स्वा.वासुदेव महाराज, ह.भ.प.वै.स्वा.रामदासबुवा , ब्रह्यीभुत महंत प. पू. स्वामी डी. के. दास जी महाराज, ब्रह्यीभुत प. पू. खंडेश्वर महाराज, वेशी आई या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आणि ह.भ.प. जगन्नाथ बुवा,( उत्तरशिव उपाध्यक्ष २६ गावे एकादशी) ह.भ.प. मदन बुवा, ह.भ.प. हेमंत बुवा (कौसा) यांच्या मार्गदर्शनाखाली हा हरिनाम किर्तन सोहळा शिळगांव चे आयोजन करण्यात आले आहे. सदभावना, सतप्रकृती व स्वधर्म यांची वाढ होऊन भक्तिभाव सोहळा परस्परातील प्रेम भावना यांची वृद्धी आणि मानवाची पारमार्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने हा सप्ताह सुरू केला आहे. सर्व संत मंडळी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळीनी,अंगत्य उपस्थित राहून या ज्ञान अमृताचा लाभ घ्यावा. अशी विनंती आणि आव्हान शिळगांवातील ग्रामस्थांनी केला आहे.
वेशी आई श्री सत्यनारायणाची महापूजा सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० ते १:०० वाजेपर्यंत असणार आहे.प्रवचन सायंकाळी ४:३० ते ५;३० वाजेपर्यंत असणार आहे. ह.भ.प. पांडुरंग महाराज यांचे सुपुत्र ह.भ.प. रामकृष्ण महाराज मुंढे (नारिवली) अध्यक्ष आ.स.पा.दि.संस्था हे सर्वांना प्रबोधन करणार आहेत. सायंकाळी हरिपाठ ५:३० वाजता सुरू होईल संत गाडगेबाबा महिला महिला हरिपाठ मंडळ काटई, चालक: सुनंदा चौधरी, साधना चौधरी, मृदंग: सुभाष पाटील, हर्ष चौधरी यांचा हरिपाठ होणार आहे. सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत कीर्तन ह.भ.प. सुभाष महाराज पाटील (नागोठणे ) रात्री ९;३० ते १०:३० जागरण भजन, श्री ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ कौसा, गायक : कु .अथर्व बुवा फौजदार मृदंग: वेध बुवा फौजदार यांचं असणार आहे.
मंगळवार दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता दिंडी सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे. ह. भ .प.जगन्नाथ बुवा (उपाध्यक्ष उत्तरशिव) नाशिकेत बुवा (नागाव )यांच्या नेतृत्वाखाली दिंडी सोहळ्याचे चे आयोजन करण्यात आले आहे. मृदंग मनी : संदेश बुवा, वेद बुवा कौसा, ज्ञानेश्वर बुवा, मित्रनाथ बुवा, चंद्रकांत (नागाव) सदाबुवा, हेमंत बुवा गोपीनाथ बुवा, मदन बुवा, कपिलबुवा, मेघनाथ बुवा (कौसा) हरिबुवा, वामन बुवा,( घेसर) सुदाम बुवा, किसन बुवा ( खार्डी) फडकेपाडा,खार्डी, कौसा,डायघर, उत्तरशिव, देसाई, मोठी देसाई, पडले, खिडकाळी, भंडार्,ली मोकाशी पाडा, दहिसर, दहिसर मोरी, पिंपरी, नेवाळी, नागांव, वाकळण,बामाली, निघू, नारिवली, घेसर, निळजे, कोळे, काटई, हेदुटणे, खोणी, मानपाडा, संदप, बेतवडे, दातिवली, म्हाताडी, आगासन, दिवा, साबे व सामुदायिक हरिपाठ मंडळ २६ गावेकर एकादशी ग्रुप, सर्व गावातील वारकरी संप्रदाय ग्रामस्थ भाविक भक्त दिंडी सोहळ्याला सहभागी होणार आहेत. मंगळवार दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७:०० ते ९:०० किर्तन ह.भ.प.डॉ.नाना महाराज कदम ( बंकट स्वामी संस्थान नेकनूर -बीड) यांचं कीर्तन होणार आहे.
बुधवार दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता काल्याचे सुश्राव्य किर्तन : ह भ प गुरुवर्य साळाराम महाराज यांचे नातू ह. भ. प.चेतन महाराज म्हात्रे ( कोपर डोंबिवली ) अध्यक्ष :वारकरी सं.प्र.मंडळ ठाणे - रायगड यांचे कीर्तन होणार आहे. मृदंगमणी: ह. भ.प अनंत बुवा (बेतवडे) सुमित बुवा, निवृत्ती बुवा, (देसाई) जयेंद्र म्हात्रे (ओवेगाव) संदेश बुवा, वेद बुवा, (कौसा )अविनाश बुवा, नवनाथ बुवा, चंद्रकांत (नागांव) तेजस महाराज मडवी (खारबाव ) या सर्व मृदुंगमणी यांची साथ कीर्तनाला लाभणार आहे. चौपदार ह.भ.प. सुरेश बुवा (दातिवली) ह.भ.प. ज्ञानेश्वर बुवा ( देसाई ) संदीप नामदेव भोईर (शिळगांव) हे सर्व तीन दिवस चोपेदार असणार आहेत. विणेकरी : ह.भ.प. मंगल बुवा (नागाव) पहिला दिवस, ह.भ.प. नारायण बुवा (नारिवली) दुसरा दिवस, ह.भ.प. गणपत बुवा (देसाई) दिवशी विणेकरील असणार आहे. असा हा हरिनाम कीर्तन सोहळा तीन दिवस शिळगावात साजरा होणार आहे.
यासाठी साधुसंत, वारकरी संप्रदाय, भाविक भक्त, सर्वांनी मोठे संख्येने उपस्थिती दाखवावी असे ग्रामस्थांकडून आव्हान करण्यात आले आहे. या तीन दिवसात शिळगावात हरिनामाचा गजर होणार आहे.