नवी मुंबई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी च्या खंडोबाला भेट देण्याऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्यातच वर्षातुन एकदा तरी नवी मुंबईतील आगरी कोळी समाजातील घरा घरातुन सहकुटुंब, सहपरिवार श्री क्षेत्र जेजुरी चे दर्शन घेण्यासाठी आवर्जून जात असतात . त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी " सदानंदाचा येळकोट, येळकोट जय मल्हार," खंडोबाच्या नावांन चांगभलं,असा जय जय कार करत जेजुरी गडाकडे प्रस्थान केले जाते.त्या अनुषंगाने कोपरखैरणे गावातील पाटील कुटुंबीय कुलदैवत ( कोटाची आळी ) यांनी त्या ठिकाणी जागरण गोंधळ घातला.
कुलदैवताचा मान हा चैत्र महिन्या पर्यंत श्री क्षेत्र जेजुरी गडावर पहायला मिळतो . त्यामुळे हा आनंद काही औरच आहे.आगरी कोळी समाजातील कुलदैवताला प्रथम पुजले जाते . प्रत्येक कुटुंबातील एकाच्या घरात प्रतिष्ठापित केले जातात.त्यात आगरी कोळी समाजात पुर्वी पासुन वर्षातुन एकदा देव श्री क्षेत्र जेजुरी ला घेऊन जाण्याची प्रथा आहे.ही प्रथा जुन्या पिढीतील्यांन कडुन ही कायम जोपासली जात आहे.त्यामुळे आजही प्रत्येक कुटुंबात एकोपा पहायला मिळतो.नवीन वर्षाच्या सुरु होणारा श्री कुलदैवताचा आर्शिवाद घेण्याचा काळ मानला जातो.त्यामुळे प्रत्येक कुटुंबात आपल्या नातेवाइकांन बरोबर श्री क्षेत्र जेजुरी खंडोबाच्या दर्शनासाठी जात असतात.आपल्या देव घरात असणाऱ्या कुलदैवताच्या म्हणजे खंडोबाला भेटवुन आणतात.काही टाक ( पादुका ) जुने जर्ज झाले असतील ते देखील जेजुरी गडावरून नवीन आणले जातात.एक प्रकारे अश्या पध्दतीने देवांची भेट घडवून आणली जाते.
प्रत्येक कुटुंबातील सदस्य हे प्रत्येक घरातुन पती व्यक्ती वर्गणी काढून त्यामध्ये प्रवासभाडे , राहण्याचा व जेवणाचा असा एकत्रित खर्च वर्गणी स्वरूपात एकत्रित पणे जमा केला जातो.वाजत गाजत कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी गडावर घेवुन जातात.आगरी कोळी समाजातील सध्या कुलदैवतांच्या भेटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आखले जात आहेत.गावा गावात असणाऱ्या पाटील , म्हात्रे, मुकादम, वेटा, आगास्कर आदी कुटुंबांचे प्रत्येकांचे वेगवेगळी घरची कुलदैवत आहेत.यात प्रामुख्याने कुलदैवत असणाऱ्या खंडोबाचा समावेश आहे.गावच्या वेशी वर आल्यावर ढोल ताशा बॅन्ड पथकांच्या गजरात मिरवणूक नाचत गाजत भंडारा उधळत काढण्यात आली.त्यानंतर कुलदैवतेची स्थापना देव घरात करण्यात आली अशी माहिती श्री.अविनाश भरत पाटील यांनी दिली.