ठाण्यातील समारोह बॅक्वेट्स येथे “राष्ट्रीय मतदार दिन” उत्साहात साजरा
ठाणे,दि.25:- “मतदानासारखे काहीच नाही, मी मतदान नक्की करेन” (Nothing like Voting… Vote for Sure) या घोषवाक्याला स्मरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणी करून घ्यावी, मतदान नक्की करावे आणि देशाप्रति आपली कर्तव्यपूर्ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.
15व्या “राष्ट्रीय मतदार दिन” निमित्त येथील समारोह बॅक्वेट्स येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना मल्लिकार्जून माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्केपाटील, विठ्ठल इनामदार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, बित्तंबातमी वृत्तपत्राचे संपादक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ठाणे भूषण तथा सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्ट, ठाणेच्या अध्यक्ष श्रीमती मीरा कोरडे, चित्रपट दिग्दर्शक नितीन कांबळे, अभिनेत्री अश्विनी चवरे, अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष तथा जिल्हास्तरीय दिव्यांग आयकॉन अशोक भोईर, किन्नर अस्मिता वीणा केणे व ठाणे सिटिझन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन, तहसिलदार संदीप थोरात, स्मिता मोहिते, प्रदीप कुडाळ, उज्वला भगत, नायब तहसिलदार स्मितल यादव, जिल्हा निवडणूक कार्यालयाचे इतर अधिकारी-कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शिनगारे पुढे म्हणाले की, आपण सर्व प्रगल्भ लोकशाही असलेल्या देशाचे नागरिक आहोत, याचा आपल्याला अभिमान आहे. मतदारयादीत समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश असावा, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण ठाणे जिल्ह्यात विविध संस्थांच्या, व्यक्तींच्या एकत्रित सहकार्याने मतदान जनजागृतीचे आणि निवडणुकीचे कार्य उत्तमरित्या करू शकलो. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते किन्नर, दिव्यांग यांचेही मोलाचे योगदान मिळाले आहे. याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी आहे.
259 बेघर व्यक्तींची मतदार नोंदणी करून त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार बजाविण्याची संधी आपण देवू शकलो. तळागाळातील लोकांना, देहविक्रय करणाऱ्या महिलांना तसेच इतरही काही उपेक्षित घटकांना मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणू शकलो, याचे मनस्वी समाधान आहे, असे ते म्हणाले.
नवमतदारांमध्ये आपण योग्य ती जाणीव जागृती करून त्यांनाही मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात यशस्वी ठरलो, असे सांगून त्यांनी नवमतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले आणि या वर्षात आपण नवमतदार नोंदणी मध्ये पहिल्या क्रमांकावर येण्याचा संकल्प करूया, असे आवाहन केले.
श्री.शिनगारे म्हणाले की, ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या साधारण एक कोटीच्या आसपास असून आतापर्यंत जवळपास 72 लाख 29 हजार मतदार नोंदणी पूर्ण झाली आहे. यापैकी 18 ते 19 या वयोगटातील आणि 20 ते 29 या वयोगटातील मतदार नोंदणी अधिक जोमाने करण्यात येईल. या घटकांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या मतदारांचा निवासस्थानाचा पत्ता बदललेला आहे, त्यांनी निवडणूक प्रशासनाशी संपर्क साधून आपला तपशील अद्ययावत करून घेणे, ही प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे. मतदान दिवसाकडे सुट्टीचा दिवस म्हणून पाहू नये तर मतदान करावे. भारत निवडणूक आयोगाने प्रसारित केलेले “मै भारत हू..” हे गीत सर्व भारतीय मतदारांसाठी प्रेरणादायक ठरले आहे.
आजचा नवयुवक हा संवेदनशील आहे, जागरूक आहे. आपला देश अत्यंत सुरक्षित हाती आहे. ही पिढी देशाला सूवर्णकाळ प्राप्त करून देईल, यात शंका नाही. आजची तरुणाई ही आपल्या देशाची शक्ती आहे. भारत देशाची वाटचाल यामुळे विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे सुरू झाली आहे. नुकताच मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा प्रशासनासाठी जाहीर केला आहे. ठाणे जिल्हा सर्वसामान्य जनतेसाठी लोकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने आखलेल्या या कृती आराखड्याची निश्चित यशस्वीपणे अंमलबजावणी करेल, यात शंका नाही, असे जिल्हाधिकारी श्री.शिनगारे शेवटी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बित्तंबातमी वृत्तपत्राचे संपादक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ठाणे भूषण तथा सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्ट, ठाणेच्या अध्यक्षा श्रीमती मीरा कोरडे, चित्रपट दिग्दर्शक नितीन कांबळे आणि अभिनेत्री अश्विनी चवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून राष्ट्रीय मतदार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या सर्वांनी सशक्त लोकशाहीसाठी मतदार नोंदणी आणि मतदानाचे महत्व पटवून दिले. तसेच लोकशाही टिकविण्यासाठी निवडणूक यंत्रणा व प्रशासन घेत असलेल्या अथक परिश्रमांसाठी त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या कार्यक्रमात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा संदेश असलेली त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाकडून प्रसारित झालेले “मै भारत हूं” लघुचित्रफित दाखविण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी उपस्थितांना मतदान प्रतिज्ञा दिली. तसेच काही नवमतदारांना प्रातिनिधीक स्वरूपात मतदार ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा उद्देश आणि जिल्ह्यातील मतदार नोंदणी व अलीकडील लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत झालेले जिल्ह्याचे काम याविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
तहसिलदार उज्वला भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट काम केलेल्या विविध अधिकारी, कर्मचारी, व्यक्ती, संस्थांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे-
या कार्यक्रमात मतदार नोंदणी मोहिमेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल एन.के.टी महाविद्यालय, सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्टचे सरस्वती विद्यालय यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मतदान नोंदणी अधिकारी प्रशांत काळे, 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संदीप थोरात, तहसिलदार (स्वीप नोडल अधिकारी) श्रीमती स्मिता मोहिते, 135 शहापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नायब तहसिलदार शंकर डामसे, 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नायब तहसिलदार मदन शेलार, 149 मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे महसूल सहाय्यक दीपक कदम, 134 भिवंडी ग्रामीण (अज)चे संगणक चालक विलास पाटील, 135 शहापूर (अज)चे संगणक चालक अविनाश सासे, 136 भिवंडी पश्चिमचे संगणक चालक प्रथमेश जोशी, 137 भिवंडी पूर्वचे संगणक चालक सुमित चौधरी, 138 कल्याण पश्चिमच्या संगणक चालक ज्योती दत्तात्रय घोडेकर, 139 मुरबाडचे संगणक चालक भूषण खंडागळे, 140 अंबरनाथचे संगणक चालक सचिन भंडारी, 141 उल्हासनगरच्या संगणक चालक मीनल निकाळजे, 142 कल्याण पूर्वच्या संगणक चालक पूनम कांबळे, 143 डोंबिवलीचे संगणक चालक सागर जाधव, 144 कल्याण ग्रामीणच्या संगणक चालक गौतमी जाधव, 145 मीरा-भाईंदरचे संगणक चालक चेतन भोईर, 146 ओवळा माजिवडाच्या संगणक चालक सोनाली अहिरे, 147 कोपरी पाचपाखाडीच्या संगणक चालक अंकिता पळसमकर, 148 ठाणेचे संगणक चालक अनिकेत धावरे, संगणक चालक 149 मुंब्रा कळवाच्या दीपिका जाधव, 150 ऐरोलीचे संगणक चालक नितेश कुमार, 151 बेलापूरचे संगणक चालक प्रशांत जाधव, 134 भिवंडी ग्रामीण (अज)चे पर्यवेक्षक संदीप परदेशी, 135 शहापूर (अज)चे पर्यवेक्षक महेंद्र रंगनाथ भीमथे, 136 भिवंडी पश्चिमच्या पर्यवेक्षक रफाना मोमीन, 137 भिवंडी पूर्वचे पर्यवेक्षक महेश दशरथ वनवे, 138 कल्याण पश्चिमच्या पर्यवेक्षक मालती राजेंद्र तिवारी, 139 मुरबाडचे पर्यवेक्षक काशिनाथ हिरत शेलवले, 140 अंबरनाथचे पर्यवेक्षक प्रशांत मच्छिंद्र पवार, 141 उल्हासनगरचे पर्यवेक्षक रवींद्र बेहेनवाल, 142 कल्याण पूर्वचे पर्यवेक्षक मुकेश पवार, 143 डोंबिवलीचे पर्यवेक्षक संतोष पाटील, 144 कल्याण ग्रामीणचे पर्यवेक्षक योगेश तुकाराम मोरे, 145 मीरा-भाईंदरचे पर्यवेक्षक विकास शेळके, 146 ओवळा माजिवडाचे पर्यवेक्षक सुजित घोणे, 147 कोपरी पाचपाखाडीचे पर्यवेक्षक वैभव पडवळ, 148 ठाणेचे पर्यवेक्षक हेमंत लोखंडे, 149 मुंब्रा कळवाचे पर्यवेक्षक मनोज इंदुरकर, 150 ऐरोलीचे पर्यवेक्षक शक्ती सुतार, 151 बेलापूरचे पर्यवेक्षक निलेश मोरे, 134 भिवंडी ग्रामीण (अज)चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गोविंद बापू वाकसे, 135 शहापूर (अज)च्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी योगिता बिरारी, 136 भिवंडी पश्चिमच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दीपिका भोईर, 137 भिवंडी पूर्वचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अतार इमरान इकबाल, 138 कल्याण पश्चिमच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ज्योत्सना चुडे, 139 मुरबाडचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अरविंद दशरथ पवार, 140 अंबरनाथचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सहदेव वामन कपाले, 141 उल्हासनगरच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मुमताज खान, 142 कल्याण पूर्वचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दीपेश म्हात्रे, 143 डोंबिवलीच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्चना रिजंड, 144 कल्याण ग्रामीणचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुभाष कारभारी कणसे, 145 मीरा-भाईंदरच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अवंती भोईर, 146 ओवळा माजिवडाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उर्मिला गवाळे, 147 कोपरी पाचपाखाडीच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रतिभा विष्णू वत्रे, 148 ठाणेच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अमिता नितीन कळंबे, 149 मुंब्रा कळवाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ज्ञानदेव धावजी हेमाडे, 150 ऐरोलीच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुरेखा राजीव शिंदे, 151 बेलापूरचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बबन आव्हाड, तसेच ठाणे सिटिझन्स फाउंडेशन, अपंग विकास संस्था या संस्थांना तर आस्था परिवार डोंबिवली, आदिती आनंदी उल्हासनगर 4, ॲक्शन रिसर्च सेंटर ठाणे, अलर्ट इंडिया वाशी, अपूर्वा उमंग भिवंडी, सिडीआय युनिट 1 मिरा रोड, सिडीआय युनिट 2 नालासोपारा, एफपीएआय युनिट 1 भिवंडी, एफपीएआय युनिट 2 कल्याण, महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र ऐरोली या एफएसडब्ल्यू टीआय यांना तर किन्नर अस्मिता 1 शहाड-कल्याण, किन्नर अस्मिता 1 भिवंडी, सखी चार चौघी ट्रस्ट नालासोपारा, त्रिवेणी समाज विकास केंद्र कळवा, एकता इक्वल नवी मुबंई या टीजी टीआय यांचा प्रशस्तिपत्रक देवून सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील पूजा तिगोटे, प्रशुल शेट्टी, विश्रुत पुजारी, क्रिस मॅथ्यू, सिद्धी पाटील, सोहम गाडेकर, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील सक्षम नागेंद्र सिंग, आशिका दिनेश सिंग, आवेश जुमान खान, ओम गणेश गाजवे, रोहिणी जयस्वाल, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील साक्षी भोला शर्मा, आयुष अतुल कनोजिया, 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील दिशा कैलास कवाळे, विशाल सुरेश बोट, रिया यादव, करण राम, दिशा कोठारे या नव मतदारांना प्रातिनिधीक स्वरुपात मतदान ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.