डोंबिवली ( शंकर जाधव ) : 'देव तरी त्याला कोण मारी' अशी म्हण डोंबिवलीतील एका दोन वर्षीय बाळाच्या बाबत् म्हणावी लागेल.हा चिमूरडा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडला मात्र इमारतीतुन बाहेर पडल्यानंतर भावेश एकनाथ म्हात्रे याने बालकाला पडताना पाहून जीवाची पर्वा न करता त्याला झेलण्याचा प्रयत्न केला. हा बालक भावेशच्या हातातून पायावर पडला.बालक सुखरूप असल्याचे पाहून भावेशने देवाला हात जोडून आभार मानले. डोंबिवली पश्चिमेकडील अनुराज हाईट्स टॉवर मध्ये शनिवार 25 तारखेला दुपारच्या सुमारास ही घटना इमारतीच्या बाहेरील सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. भावेशचे सर्वत्र कौतुक होत असून आमदार रवींद्र चव्हाण यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा येथील गावदेवी मंदिरजवळील 13 मजली अनुराज हाईट्स टॉवर आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन वर्षीय बाळ खाली पडल. त्याचवेळी इमारतीतून बाहेर पडत असलेल्या भावेश एकनाथ म्हात्रे या तरुणाने चिमुरड्याला खाली पडताना पाहिले प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता धावत जात झेप घेत चिमुरड्याला पकडण्याचा प्रयत्न केला. चिमुरड्याचा पूर्णपणे आधार न मिळाल्याने तो त्यांच्या हातातून सरकत पायावर पडला. मोठी दुर्घटना टळली आणि त्याचा जीव वाचला.ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भावेश म्हात्रे यांच्या धाडसाचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे. त्यांची तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे एका लहान बाळाचा जीव वाचला आहे.भावेश म्हात्रे हा आता डोंबिवलीतील लोकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे "देव तारी त्याला कोण मारी" ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. भावेश म्हात्रेचे सर्वत्र कौतुक होत असून तरुणांकरता तो आदर्श ठरला आहे.
आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, डोंबिवलीतील देवीचापाडा येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडणाऱ्या २ वर्षीय बाळाचा जीव भावेश म्हात्रे या तरुणाच्या प्रसंगावधनतेमुळे वाचला. भावेशने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेळीच बाळाचा झेल घेतल्यामुळे बाळावर आलेले संकट टळले.