दिवा ( विनोद वास्कर ) : २६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४:०० वाजता आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आगासन दिवा च्या वतीने आज हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे,माजी आमदार राजू पाटील यांच्या सौभाग्यवती योगिता पाटील, माजी आमदार सुभाष भोईर यांच्या सौभाग्यवती रत्नमाला भोईर, भारतीय जनता पार्टीच्या मोर्चा अध्यक्षा सपना भगत, समाजसेविका अर्चना निलेश पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दिवा शहर संघटिका ज्योती राजकांत पाटील, माजी नगरसेवक दीपक जाधव, माजी नगरसेविका दर्शना चरण म्हात्रे, तसेच आगासन गावातील सर्व महिला बचत गटातील महिलां या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आलेल्या सर्व महिलांचा मोलाचा सहभाग लाभला.
आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आगासन दिवा तर्फे लहान मुलींनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले. महिलांनी विविध रांगोळ्या काढल्या होत्या. त्या रांगोळीचे महत्त्व होते ''बेटी बचाव बेटी पढाव'' हा संदेश रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला. खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात आलेल्या सर्व महिलांनी सहभाग घेतला होता. त्यातल्या पाच महिला या विजेता ठरल्या.विजेता महिलांना पैठणी साडी देण्यात आल्या. ज्या लहान मुलींनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले होते त्यांना सुद्धा गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडण्यासाठी महिला शक्ती प्रतिष्ठान आगासन दिवा च्या अध्यक्षा उषा मुंडे, उपाध्यक्ष रंजना तांडेल, भारती म्हात्रे, योगिता मुंडे, दीपिका मुंडे, ज्योती म्हात्रे, प्रीती पाटील, पुनम मुंडे, सविता वायले, इतर सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम पार पडण्यासाठी मोलाची मेहनत घेतली.
शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.