नवी मुंबई : कोपर खैरणे सेक्टर २३ मधील भुमिपुत्र मैदानावर २५ जानेवारी रोजी कै.कु.सुनिल सदु पाटील स्मृति चषकाचे सालाबाद प्रमाणे यंदाही २८ व्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत एकुण १२ संघानी भाग घेतला होता.या स्पर्धेचा शुभारंभ कोपर खैरणे ग्राम विकास मडळांचे प्रमुख सल्लागार श्री.शिवराम परशुराम पाटील ( माजी नगरसेवक ) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला.सदर क्रिकेट स्पर्धेप्रसंगी ग्राम विकास मडळांचे अध्यक्ष श्री.सोपान म्हात्रे ( महाराज ) , श्री.ज्ञानदेव परशुराम पाटील, श्री.विद्यांनद दिनानाथ पाटील, श्री.चद्रकांत एकनाथ वेटा , श्री.राकेश पंढरीनाथ पाटील तसेच ग्राम विकास मडळांचे ईतर पदाधिकारी आदि उपस्थित होते
नुकताच स्पर्धैचा अंतिम सामना खेळविण्यात आला.त्या मध्ये अंतिम विजेते पद स्पाॅट बाॅईज संघाने पटकावले तर गोल्डन संघाने उपविजेतेपद तसेच तृतीय विजेते पद म्हणून जय संतोषी माता या संघाने पटकावला सदर क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मा.श्री.शिवराम परशुराम पाटील ( माजी नगरसेवक ), श्री.भानुदास सुदाम म्हात्रे, श्री.राजेश सदु पाटील, श्री.कैलास गोविंद पाटील, श्री.किसन गंगाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.या प्रसंगी मंडलाचे अध्यक्ष - श्री.गोरखनाथ रामदास म्हात्रे , सचिव - श्री.संदीप ज्ञानदेव पाटील,खजिनदार - श्री.अनिकेत किसन पाटील यांच्या समावेत पार पडला.
या स्पर्धेत मालिकाविर म्हणून स्पाॅट बाॅईज संघाचा मयुरेश चंद्रकांत म्हात्रे हा खेळाडु ठरला त्याला कुलर देऊन सन्मानित करण्यात आले.अशी माहिती कोपर खैरणे गावातील क्रिडाप्रेमी अविनाश भरत पाटील यांनी दिली.