Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

डोंबिवलीतील होली एंजल्स जूनियर महाविद्यालयात महाराष्ट्रातील पहिला हायलाइन खेळ


माजी विद्यार्थ्याकडून साहसी खेळाचे प्रदर्शन

डोंबिवली ( शंकर जाधव ) : हायलाइन स्लॅकलाइन या रोमांचक खेळात प्रविण्य मिळवलेल्या तोशिथ नायडू या
डोंबिवलीतील होली एंजल्स जूनियर महाविद्यालयातील विद्यार्थ्याने याच महाविद्यालयात शनिवार 18 तारखेला
महाराष्ट्रातील पहिल्या हायलाइन स्लॅकलाइन खेळ हा साहसी खेळ खेळला. आपल्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेत शारीरिक इजा होणार नाही याकरता हार्नेस आणि टेथर यासारख्या सुरक्षा उपकरणाचा वापर केला. डायरेक्टर डॉ. ओमेन डेविड, प्राचार्य बिजॉय उमन, शिक्षकवर्ग व विद्यार्थीवर्ग यांच्या उपस्थितीत तोशिथ नायडू याने हा साहसी खेळ खेळला. विद्यार्थ्यांच्या टाळयातून मिळणारा उत्साह व आपल्या खेळाकडे लक्ष यामुळे तोशिथ नायडू याला हे शक्य झाले.

या साहसी खेळानंतर डायरेक्टर डॉ.ओमेन डेविड, प्राचार्य बिजॉय उमन यांनी तोशिथ नायडू यांचे अभिनंदन करत पुष्पगुच्छ दिले.डायरेक्टर डॉ.ओमेन डेविड यांनी तोशिथ नायडू यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना तोशिथ नायडू म्हणाला, याआधी केरळ, लडाख येथे हा साहसी खेळ खेळला आहे. तीन हजार फूट उंच ठिकाणी दोन डोंगरांच्या मध्ये हा खेळ खेळला असून सेफ्टी घेतली होती. तर डायरेक्टर डॉ.ओमेन डेविड म्हणाले, होली एंजल्स जूनियर महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्याने हा खेळ दाखवून आमची मने जिंकली. प्राचार्य बिजॉय उमन म्हणाले, तोशिथ नायडू यांच्या प्रयत्नांना आमच्या संस्थेत हायलाइन आणण्यासाठी पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे, धैर्य, सर्जनशीलता आणि साहसी भावना जोपासणे, ही आमची भूमिका या कार्यक्रमाशी सुसंगत आहे. कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधून घेईल, असा विश्वास असून हे महाराष्ट्रासाठी आणि संस्थेसाठीही एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या उपक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

हायलाइन खेळाबद्दल हायलाइन हा एक साहसी खेळ आहे ज्यामध्ये उंचीवर ताणलेल्या दोरीवर चालण्याचा समावेश होतो. या खेळात जबरदस्त लक्ष, संतुलन आणि धैर्य आवश्यक असते. हा खेळ भीतीवर मात करण्याचे आणि मर्यादा ओलांडण्याचे प्रतीक मानला जातो. होली एंजल्स जूनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना साहसी खेळांच्या या अद्वितीय जगाशी परिचित करून देणे आणि वैयक्तिक विकासासाठी नवीन मार्ग खुले करणे असा कार्यक्रमाचा उद्देश होता. हायलाइन हा स्लॅकलाइन या खेळाचा एक प्रकार असून, तो सध्या जागतिक स्तरावर लोकप्रिय झाला आहे. स्लॅकलाइन जमिनीपासून जवळ खेळला जातो, तर हायलाइन हा खेळ डोंगर, दऱ्या किंवा शहरी भागातील उंच ठिकाणी खेळला जातो. हा खेळ शारीरिक कौशल्य, मानसिक ताकद आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा संगम आहे. या खेळात हार्नेस आणि टेथर यासारख्या सुरक्षा उपकरणांचा वापर केला जातो, ज्यामुळे खेळाडू सुरक्षित राहतात.तोशिथ नायडू यांचे योगदान तोशिथ नायडू हे होली एंजल्स जूनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी असून, साहसी खेळांच्या क्षेत्रातील एक प्रतिष्ठित नाव आहेत. त्यांनी भारतात आणि परदेशात अनेक हायलाइन मोहिमांमध्ये भाग घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |