जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ साजरा
ठाणे - जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. दि. १७ जानेवारी, २०२५ रोजी ‘कलाविष्कार २०२५’ सांस्कृतिक कार्यक्रम डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला. कार्यक्रमांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्रमुख पाहुणे कलाकार श्रावणी महाजन याच्या हस्ते करण्यात आले.
कलेला वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद आयोजित कलाविष्कार २०२५ कार्यक्रम अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा असून सर्वांनी आनंदाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे व सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, स्टेट बँक ऑफ इंडिया येथील डेप्युटी जनरल मॅनेजर सुरजीत त्रिपाटी, इंडियन बँक येथील डेप्युटी जनरल मॅनेजर रविंद्र सिंग व बँक ऑफ बडोदा येथील डेप्युटी जनरल मॅनेजर मनोज गुप्ता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख संदिप चव्हान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख संजय बागुल, बांधकाम विभाग प्रमुख संदिप चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, लघुपाट बंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी, विभाग प्रमुख तसेच तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दररोजच्या कामातून अधिकारी व कर्मचारी यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे कलाकार श्रावणी महाजन यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या अप्रतिम गाण्याने वातावरण प्रसन्न झाले. या कलाविष्कार २०२५ कार्यक्रमांत गायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस, एकपात्री नाटक, सामुहिक नाटक, वेशभूषा इत्यादी कला गुण यांचे अधिकारी व कर्मचारी याच्याकडून सादरीकरण करण्यात आले. या दोन्ही दिवसाची कार्यक्रमाची धुरा उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी यथार्थ पणे पेरल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा स्तर, तालुका स्तर, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी वर्ग व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.