Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

संविधान गौरव अभियान संदर्भात महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्यालयात महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक


डोंबिवली ( शंकर जाधव ) भारतीय जनता पार्टीचे संविधान गौरव अभियान पूर्ण देशभर चालू असून या संविधानाचे संयोजक राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आहेत. महाराष्ट्र मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये राज्यभर संविधान गौरव अभियान चालू आहे.राज्याचे संयोजक आमदार अमित गोरखे आहेत.

संविधान गौरव अभियान संदर्भात सोमवार 20 तारखेला महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्यालयात महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळे, माजी मंत्री भाई गिरकर, तसेच राज्याच्या सरचिटणीस माधवीताई नाईक यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले

राज्यभर संविधान गौरव अभियानाचे कार्यक्रम राबविले जात असून हे अभियान 26 तारखेपर्यंत राबवायचे आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये एक जाहीर सभा तसेच वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शाळांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये संविधानाच्या विषयात अभियान रॉबिवली जात असून या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय नेत्यांच्या सुद्धा संविधान गौरव अभियानाचे विषयात सभा आयोजित केलेले आहेत.16 तारखेला ज्योतिरादित्य शिंदे यांची पुणे येथे सभा झाली असून महाराष्ट्रमध्ये अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीनजी गडकरी लालसिंग आर्या अशा अनेक मान्यवरांच्या सभा या महाराष्ट्र प्रदेशामध्ये होणार आहेत.परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा नेहमीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी सन्मान केलेला आहे. काँग्रेसने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा लोकसभेत जाण्यापासून रोखले त्यांना निवडणुकीत पराभूत केले हे सर्व जनतेला माहित आहे आणि भारतीय जनता पार्टी हेच संविधानाची खरी सन्मान करणारी पार्टी आहे हेही सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आलेले आहे असे यावेळी माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळे म्हणाले.

राज्यभर या संविधान गौरव अभियानास उदंड प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेशाचे अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस व संविधान गौरव अभियानाचे राज्याचे सहसंयोजक शशिकांत कांबळे यांनी दिली. 

बैठकीत माधवी नाईक, माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळे, माजी मंत्री भाई गिरकर, धम्मपाल मेश्राम, शशिकांत कांबळे, पंडित सूर्यवंशी, दिनेश पगारे, डॉ. मिलिंद माने, तेजस निर्भवणे, धनराज बिर्दा, सुरेश गायकवाड, अशोक उमर्गेकर यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |