कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याण पूर्व,साकेत साकेत विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुलभा गायकवाड उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य, नाटक, गायन अशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.याप्रसंगी स्नेहसंमेलनात साकेत ज्ञानपीठचे सी.ई.ओ. सौ.शोभा नायर , प्रमोद राम उजागर तिवारी साकेत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉ.सनोज कुमार, साकेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत भऱ्हाटे, साकेत कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य श्री.विद्याप्रकाश मोरया,डॉ. सरोज कुमार, साकेत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सौ.पिऊली भट्टाचार्य , साकेत विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ ममता सिंग या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य .नाटक अशा विविध कार्यक्रमांचा सोहळा यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.