Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

तो शिवसैनिक देवाच्या रूपाने आला.. रुग्णवाहिका चालक बनला...

डोंबिवली ( शंकर जाधव ) : जनतेची सदैव सेवा' या शिकवणीप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकाने समाजसेवेचे व्रत घेतले.कल्याण लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय सेवा सुरु आहे अशी माहिती मिळाल्यावर डोंबिवलीतील एका जेष्ठ नागरिकांने थेट आमदार मोरे यांना फोनवरून संपर्क साधला. जनतेसाठी नेहमीच पुढे असणारे आमदार मोरे यांनी जेष्ठ नागरिकांचे म्हणणे ऐकूण आपल्याला वैद्यकीय उपचार नक्की मिळतील असे सांगितले. आमदार मोरे यांनी शिवसैनिक वैभव विलास राणे यांना सदर माहिती दिली.शाखाप्रमुख विशाल पवार, शिवसैनिक वैभव विलास राणे,दीपक पवार, मयूर दळवी ,संगमेश्वर मोरे हे यांनी जेष्ठ नागरिकांच्या घरी पोहोचले. रुग्णालयापर्यत जाण्यासाठी रुग्णावाहिका होती पण रुग्णवहीका चालक नव्हता. वेळ न दवडता शिवसैनिक राणे यांनी रुग्णावाहिका चालविण्याचे ठरविले. राणे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या शिवसैनिकांनी जेष्ठ नागरिकाला उचलून रुग्णावाहिकेत बसविले. राणे यांनी रुग्णावाहिलका चालवत रुग्यालयापर्यत नेले. जेष्ठ नागरिकांवर उपचार झाल्यावर पुन्हा त्यांना रुग्णावाहिकेत बसवून घरी पोहचविले. वेळवर उपचार मिळण्याने ज्येष्ठ नागरिकाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे व शिवसैनिकांचे आभार मानले.
याबाबत शिवसैनिक वैभव विलास राणे यांना विचारले असता म्हणाले, शिवसेनापक्ष नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खाली व आमदार राजेश मोरे यांच्या संस्कारात घडलेले आम्ही कार्यकर्ते आहोत.आमदार जनसंपर्क प्रतिनिधी वैद्यकीय विभाग हे पद माझ्याकरता छोटे आहे. पण नागरिकांची कामे होणे हे मी आमदार मोरे यांच्या संस्कारात शिकून जनतेची कामे होणे महत्वाचे आहे. माझ्याकरता पद मोठे नाही तर माझ्या लोकप्रतिनिधीमार्फत जनतेची कामे होणे महत्वाचे आहे.त्यासाठी मला माझे पद महत्वाचे नाही असे संस्कार माझ्या पक्षश्रेष्ठी ते माझ्या लोकप्रतिनिधीनी केले.पद हे भूषविण्यासाठी नसत तर ये जनतेची कामे करण्याकरता असते. म्हणूनच मी त्या संस्काराचा वारसदार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |