उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) भारतीय पोर्ट व डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील, सुधीर घरत, कोषाध्यक्ष, रवींद्र पाटील विश्वस्त -जेनपीए, डीपी सोनावणे, अनिल चिर्लेकर यांनी दिनांक २१ जानेवारी रोजी मा. केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल ह्यांनी जेनपीए येथे दिलेल्या भेटीदरम्यान सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. सदर प्रसंगी जेनपीएचे अध्यक्ष मा. श्री उन्मेष शरद वाघ व विद्यमान आमदार महेश बालदी उपस्थित होते. त्यावेळी मंत्री महोदयांनी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.