ठाणे /शिळफाटा (विनोद वास्कर ) : ३ शाळा एकत्र येऊन एकाच ठिकाणी ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सर्वात प्रथम शिळगावात प्रभात फेरी काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. ध्वजारोहण ही करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वज गीत, राज्य गीत म्हणण्यात आले. भारतीय संविधान प्रास्ताविका वाचन करण्यात आले. तसेच शपथ सुद्धा घेण्यात आली.
शिळगावातील हाशा रामा पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्वांच्या उपस्थितीत २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता ७६ वा.प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.१५०० वर यावेळी उपस्थिती होती. हाशा रामा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शिळ, ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ८१, ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक २६ या तीन शाळा एकत्र येऊन एकाच ठिकाणी ७६ वा.प्रजासत्तादिन साजरा केला. आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मार्गदर्शन सुद्धा केले. चौथी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तसेच भाषणे सुद्धा केली. आलेल्या मान्यवरांचं तिन्ही शाळेकडून सत्कार करण्यात आले. तसेच शिक्षक गुणवंत विद्यार्थ्यांचे सुद्धा सत्कार करण्यात आले. खास करून या वर्षी हाशा रामा पाटील विद्यालयाच्या नववीच्या मुलींनी एनसीसी प्रथक संचालन करून सर्वांची परवानगी घेऊन राष्ट्रध्वजाला सलामीसाठी आदेश दिले.
उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. त्यानंतर सर्वांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, अशा घोषणा दिल्या. मानव सेवा प्रतिष्ठान सेवा संस्था चे अध्यक्ष सुनिल आलिमकर यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांसाठी घोषणा केली. शिळ देसाई, डायघर परिसरातील सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक परिक्षेत इयत्ता दहावी ९०% तसेच बारावी कलासखेत ८०टक्के वाजिनसाठी ७५ टक्के व विज्ञान शाखेत ७०% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा गुणवंत विद्यार्थ्यांना मानव प्रतिष्ठान सेवा संस्थेतर्फे पारितोषिक म्हणून हॉटेल ताज मुंबई येथे मोफत मेजवानी पार्टी देण्यात येईल अशी घोषणा केली. या अगोदर सुद्धा त्यांनी ४ विद्यार्थ्यांना २ शिक्षकांना विमानातून प्रवास हा मोफत दिला होता. तसेच आजच्या दिवशी शिळ, देसाई, डायघर , परिसरातील शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांना ५००० हजार पेन हे वाटण्यात आले.
एक चांगला उपक्रम त्यांनी यावर्षी राबवला आहे.आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ सुद्धा आणले होते. आणले खाऊ विद्यार्थ्यांना वाटप सुद्धा करण्यात आले. आलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शिळगावचे पोलीस पाटील संतोष भोईर यांच्या हस्ते मे. २०२५ मध्ये निवृत्त होत असलेल्या हायस्कूलचे आदर्श शिक्षक राजेंद्र डोंगर मोरे यांना फुलगुच्छ शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.मानव सेवा प्रतिष्ठान संस्था - अध्यक्ष सुनिल आलिमकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त झालेल्या सोमनाथ पतंगे सर यांना फुलगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.संस्था सदस्य रमेश जोमा काठे यांच्या हस्ते ठा.म.पा. सीआरसी गट क्रमांक ०७ गटप्रमुख उमाकांत नारायण कुडे यांना फुलगुच्छ, शाल आणि सलमानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.संस्थेच्या सेक्रेटरी, ॲड. चैतन चंद्रकांत किणी मॅडम यांच्या हस्ते माजी विद्यार्थिनी रुणाली संभाजी म्हात्रे (डी फार्मसी) फुलगुच्छ, शाल, आणि सन्मानचिन्ह देऊन तिला सन्मानित करण्यात आले.रिद्धी दत्ता आलिमकर (हाशा रामा पाटील स्कूल )सिद्धी हेमंत आलिमकर (रेम्बो स्कूल), निरज विश्वास आलिमकर (सुभेदार स्कूल) या सर्व दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना फुलगुच्छ, शाल,आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.